श्री दामोदर भजनी सप्ताहामध्ये

श्री दामोदर भजनी सप्ताहामध्ये माझा बालपणा पासून सहभाग राहिलेला आहे. सप्ताहाचे स्वरूप त्यावेळी मर्यादीत होते. भाविकांची उपस्थिती तसेच स्वयंसेवक हे सुद्धा बोटावर मोजण्या एवढे, त्यामुळे उत्सवाच्या काळातील प्रत्येक गोष्ट स्मरणात राहण्या सारखी होती.
त्यावेळी काही घटना आम्ही प्रत्यक्ष पाहिलेल्या तर काही घटना श्री अण्णा जोशी यांच्या कडून ऐकिवात होत्या. घटना जरी ऐकीवात असल्या तरी त्याची साक्ष म्हणून काही पुरावे पाहण्याचा योग आम्हाला प्राप्त झाला होता.
तसे बोलायचे झाले तर शहरातील काही जागा ह्या विशिष्ट कारणासाठी प्रसिद्ध होत्या. धार्मिक कृत्या साठी परिचीत असलेल्या जागेला त्यावेळी खास महत्व होते. आताच्या दामोदर मंदिराच्या मागे असलेल्या धर्मानंद कोसंबे इमारतीच्या मागे असलेली जागा म्हणजे त्यावेळी देवाचा चव्हाटा म्हणून ओळखला जात. ती जागा आज पर्यंत केवळ एकमेव व्यक्ती वगळता अन्य कुणालाही यशाला आलेली नाही.
मुरगांव पालिकेच्या बाजूला पूर्वीची नावेलकर इमारतीच्या मागे व सध्या असलेल्या टॅम्टेशनच्या मागे असलेल्या जागेत एकेकाळी म्हणे होळी पेटविली जात. कालांतराने ह्या सर्व गोष्ट लोप पावलेल्या आहे.
लहान असताना बाजारकर समितीचा पार मंदिराकडे प्रयाण करताना आम्ही सर्व श्रीधर पै इमारती जवळ विसावा घेत असत. पै इमारतीच्या मागे गावच्या राखणदाराची जागा राखून ठेवण्यात येत. श्री दामोदर दैवत शहरामध्ये १२७ वर्षा पूर्वी आले पण त्यापूर्वी गावचा राखणदार म्हणून श्रीधर पै इमारतीच्या मागे असलेल्या त्या जागेला खूप महत्व होते. सप्ताह उत्सव समिती दरवर्षी पहिल्या रात्री राखणदाराच्या ठिकाणी पानाचाविडा, केळी, अगरबत्ती, मेणबत्ती वगैरे ठेऊन सांगणे करून नंतर पार घेऊन पुढे जात असे. तेथील राखणदारचा मान म्हणून सुरु असलेली ही प्रथा आजतागायत सुरु राहिलेली आहे. ज्या गोष्टि पूर्वी पासून सुरु राहिलेल्या आहे त्या आज किंवा उद्या सुद्धा खंडित होता कामा नये.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें