हनुमान जयंती आणि मारुतीची उपासना

हनुमान जयंती आणि मारुतीची उपासना

      शक्‍ती, भक्‍ती, कला, चातुर्य आणि बुद्धीमत्ता यांनी श्रेष्ठ असूनही प्रभु रामचंद्रांच्या चरणी सदैव लीन रहाणार्‍या मारुतीच्या जन्माचा इतिहास, हनुमान जयंती पूजाविधी आणि मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया.

१. जन्माचा इतिहास : राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ केला. तेव्हा यज्ञातून अग्निदेव प्रगट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) प्रदान केला होता. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्‍चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस मिळाले होते आणि त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस ‘हनुमान जयंती’ म्हणून साजरा करतात.

२. मारुतीला हनुमान’ हे नाव कसे पडले ? :  जन्म झाल्यावर ‘उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्व फळ असावे’, या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला ‘हनुमान’ हे नाव पडले.

३. हनुमान जयंती पूजाविधी : यादिवशी प्रातःकाळी सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करतात. हनुमंताच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे. सूर्योदयाच्या वेळी शंखनाद करून पूजनाला प्रारंभ करावा. नैवेद्याला सुंठवडा (सुंठीचे आणि साखरेचे एकत्रित मिश्रण) ठेवू शकतो. त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा. हनुमानासाठी रुईच्या पानांचा आणि फुलांचा हार करावा. पूजनानंतर श्रीरामाची आणि हनुमंताची आरती करावी.

४. मारुतीच्या उपासनेअंतर्गत करायच्या कृती : शेंदूर, रुईची पाने आणि फुले, तसेच तिळाचे तेल यांमध्ये हनुमानाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता सर्वांत जास्त असल्याने या वस्तू हनुमानाला अर्पण कराव्यात. पंचतत्त्वांवर हनुमानाचे अधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून, हनुमानाला फुले वहातांना तसेच हनुमानाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा घालतांना पाच किंवा पाचच्या पटीत असाव्या.

५. मारुतीला नारळ अर्पण करण्याची पद्धत : हनुमानाला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर नारळाची शेंडी मूर्तीकडे करून नारळ हातात धरावा. हनुमानाची सात्त्विक स्पंदने नारळात येण्यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवतेला अर्पण करावा.

६. आध्यात्मिक त्रास आणि ग्रहपीडा निवारणार्थ मारुतीची उपासना : ग्रहपीडा, शनीची साडेसाती दूर करण्यासाठी, आसुरी शक्‍तींपासून आणि आध्यात्मिक त्रासापासून रक्षण होण्यासाठी हनुमानाची उपासना सांगितली आहे.

७. नामजप आणि स्तोत्रपठण : हनुमान जयंतीच्या दिवशी वातावरणातील हनुमानतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने अधिक कार्यरत असते. त्याचा आध्यात्मिक लाभ घेण्यासाठी त्या दिवशी मारुतीचा  ‘श्री हनुमते नम: ।’ हा जप अधिकाधिक करावा. समर्थ रामदासस्वामींनी रचलेले मारुतिस्तोत्र (भीमरूपीस्तोत्र) म्हणावे. नियमित स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्‍या व्यक्‍तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षककवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्‍तींपासून रक्षण होते. तसेच रामदासस्वामी यांनी रचलेली मारुतीची (हनुमंताची) चैतन्याने ओतप्रोत भरलेली आरती म्हणावी, त्याने भक्तिभाव निर्माण होतो.

८.  बलोपासना करून हनुमंताची कृपा संपाद करूया!

धर्म-अधर्म यांच्या लढ्यातील महत्त्वाचे दैवत म्हणजे हनुमंत ! हनुमंताने त्रेतायुगात रावणाविरुद्धच्या युद्धात प्रभु श्रीरामास सहकार्य केले, तर द्वापारयुगात महाभारताच्या घनघोर युद्धात तो कृष्णार्जुनाच्या रथावर विराजमान होता. हिंदुस्थानात मोगली सत्ता अत्याचाराचे थैमान घालत होत्या, त्या वेळी महाराष्ट्रात बलोपासना रुजवण्यासाठी समर्थ रामदासस्वामींनी हनुमंताच्या मूर्तींची ११ ठिकाणी स्थापना केली आणि हिंदूंमध्ये ‘हिंदवी स्वराज्या’च्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले. त्यामुळे हनुमानजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर बलोपासनेसह भगवंताची भक्ती करण्याचा संकल्प करूया.

हनुमंतास प्रार्थना : हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण मारुतीरायाच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करूया की, हे मारुतिराया, तू जशी श्रीरामचंद्राची भक्ती केलीस, तशी भक्ती मलाही करण्यास शिकव. धर्मरक्षणासाठी मला भक्ती आणि शक्ती दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

संदर्भ : सनातन संस्थेचा लघुग्रंथ मारुति

संकलन- श्री तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था, संपर्क- (93709 58132)

———————————————————

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें