म्हापसा प्रतिनिधी
पतंजली योग समिती व बारदेश पतंजली योग समिती आयोजित 30 दिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन गोवा राज्य प्रभारी कमलैश बांदेकर यांच्या हस्ते रायकर हाॅल म्हापसा येथे करण्यात आले .
यावेळी गोवा राज्य प्रभारी विश्वास कोरगावकर पतंजली किसान सेवा समिती राज्य अध्यक्ष कमलाकांत तारी , महिला राज्य प्रभारी संध्या खानोलकर, योगासन स्पोर्ट असोसिएशन महासचिव संदेश बाराजणकर, भारत स्वाभिमान सह राज्य प्रभारी गिरीश परुळेकर ,किसान राज्य प्रभारी तुळशीदास मंगेशकर ,राघव शेट्टी, बार्देश समिति प्रभारी अधक्ष अशोक साळगावकर बार्दैश
प्रभारी सिद्धेश राऊत ,शुभांगी शिरोडकर आदी उपस्थित होते यावेळी कमलेश बांदेकर यांनी योगाचे महत्व सांगितले अशोक साळगावकर यांनी स्वागत केले तर सिद्धेश राऊत यांनी आभार मानले या शिबिरात एकूण 35 प्रशिक्षणारथी भाग घेतला आहे.
फोटो भारत बेतकेकर
योग प्रशिक्षण शिबीराच उदघाटन प्रसंगी कमलेश बांदेकर, विश्वास कोरगावकर राघव शेट्टी व इतर






