भारताची सौदी अरेबिया, बेल्जियम आणि भूतानसोबत सागरी सहकार्याबाबत चर्चा

भारताची सौदी अरेबिया, बेल्जियम आणि भूतानसोबत सागरी सहकार्याबाबत चर्चा

वाढवण, गालाथिया बे बंदर प्रकल्पांत सौदी अरेबियाला गुंतवणुकीत रस; बेल्जियमसोबत हरित सागरी मार्गाचा प्रस्ताव

पणजी: केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ‘सागरमंथन : द ग्रेट ओशन्स डायलॉग २०२६’च्या दुसऱ्या दिवशी सौदी अरेबिया, बेल्जियम आणि भूतानच्या प्रतिनिधींशी द्विपक्षीय चर्चा केली. भारताची सागरी भागीदारी अधिक दृढ करण्यासह सागरी क्षेत्रात तरुण आणि महिलांच्या सहभागावर त्यांनी भर दिला.सौदी बंदर प्राधिकरणाच्या (मवानी) प्रतिनिधिमंडळासोबत झालेल्या चर्चेत वाढवण आणि गालाथिया बे बंदर प्रकल्पांमध्ये सौदी अरेबियाच्या सहभागावर विचारविनिमय झाला. जहाजबांधणी, नाविक प्रशिक्षण आणि सक्षम पुरवठा साखळी याबाबतही चर्चा झाली. भारतातील बंदर प्रकल्प आणि सागरी विकास निधीत (एमडीएफ) गुंतवणूक करण्याची इच्छा सौदी अरेबियाने व्यक्त केली.बेल्जियममधील फ्लेमिश सरकारच्या वाहतूक, सार्वजनिक बांधकाम, बंदरे आणि क्रीडा विभागाच्या मंत्री अॅनिक डी रिडर यांच्यासोबत भारतीय बंदरे आणि अँटवर्प-ब्रुजेस बंदर यांना जोडणारा हरित सागरी वाहतूक मार्ग विकसित करण्याबाबत चर्चा झाली. हरित इंधन, स्मार्ट बंदर तंत्रज्ञान आणि गाळ काढण्याच्या तंत्रज्ञानावरही दोन्ही बाजूंनी सहकार्याच्या शक्यता तपासल्या. हरित सागरी वाहतूक आणि इंधन क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी व्हीओसी बंदराने अँटवर्प बंदरासोबत करार केला आहे.

भूतानचे पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्री ल्योनपो चंद्र बहादूर गुरूंग यांच्यासोबत झालेल्या चर्चेत राष्ट्रीय जलमार्ग-२ आणि जोगीघोपा टर्मिनलच्या माध्यमातून भूतानला जागतिक व्यापाराशी जोडण्यावर भर देण्यात आला. मानस आणि संकोश नद्यांचा मालवाहतुकीसाठी वापर तसेच दिब्रुगड येथील विकसित होत असलेल्या उत्कृष्टता केंद्रात भूतानच्या तरुणांना सागरी प्रशिक्षण देण्याबाबतही चर्चा झाली.“सौदी अरेबिया, बेल्जियम आणि भूतानसोबतच्या चर्चा भारताची सागरी भागीदारी विस्तारत असल्याचे दर्शवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत परस्परांशी जोडलेले, हरित आणि समृद्ध सागरी भविष्य घडविण्यासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून पुढे येत आहे,” असे सोनोवाल म्हणाले.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें