पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठी विभागातर्फे संत सोहिरोबानाथ अंबिये यांच्या जन्मस्थळी क्षेत्रभेटीचे उत्साहात आयोजन*
थिवि वाताहार
सारस्वत शिक्षण संस्था संचलित पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठी विभागातर्फे दि.25 ऑगस्ट रोजी पालये येथील संत सोहिरोबानाथ अंबिये यांच्या जन्मस्थळी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. गोमंतकीय श्रेष्ठ कवी संत सोहिरोबानाथ अंबिये यांचे चरित्र विद्यार्थ्यांना खुद्द अंबिये यांच्या जन्मस्थानी जाऊन शिकण्याची संधी यावेळी विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्यात आली. यावेळी शिक्षिका सौ रिचा शिरोडकर यांच्यातर्फे इयत्ता बारावीच्या पाठ्यपुस्तकातील संत सोहिरोबानाथ अंबिये यांच्या ‘हरिभजनाविण काळ’ या प्रसिद्ध कवितेचे विवेचन करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये शिल्पकलेची आवड निर्माण व्हावी तसेच या क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यांची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी पालये येथीलच ‘नेहा आर्ट गॅलरी’ तील टेरा कोटा वर्कशॉपला विद्यार्थ्यांनी भेट दिली. या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांनी माती पासून काही वस्तू बनवल्या . स्वतःच्या हातांनी बनवलेल्या वस्तू बघून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद पसरला होता.


प्रत्यक्ष अनुभवाद्वारे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. i यामध्ये एकूण 24 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या क्षेत्रभेटीसाठी विद्यालयाच्या शिक्षिका सौ रिचा शिरोडकर तसेच बी.एड. प्रशिक्षणार्थी राधिका सुतार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
फोटो भारत बेतकेकर
संत सोहिरोबानाथ जन्मस्थळी भेट व नेहा आर्ट गॅलरी ला भेट






