फ्रान्सिस झेविअर याने गोव्यात इन्क्विझिशन स्थापन करण्याची मागणी केल्याचा दिवस
गोव्यात १६ मे ‘काळा दिवस’ घोषित करा ! – हिंदू एकता मंच, गोवा
पणजी, १३ मे – १६ मे १५४६ हा दिवस गोव्याच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्यायाची सुरुवात करणारा आणि अत्यंत वेदनादायी दिवस मानला जातो. याच दिवशी फ्रान्सिस झेविअर याने पोर्तुगालचे जॉन -३ यांना पत्र लिहून गोव्यात इन्क्विझिशन (धर्मन्यायालय) स्थापन करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने १६ मे हा दिवस गोव्यात ‘काळा दिवस’ म्हणून घोषित करावा आणि गोव्यातील राष्ट्रभक्त नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा द्यावा, अशी मागणी हिंदू एकता मंच, गोवा यांनी १३ मे या दिवशी सायंकाळी येथील आझाद मैदानावर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केली आहे. या पत्रकार परिषदेला हिंदू एकता मंचचे सर्वश्री नितीन फळदेसाई, सत्यविजय नाईक, जयेश थळी, सुजन नाईक, अभय सामंत, दिनीन पेडणेकर आदींची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत ‘हिंदू एकता मंच’च्या पदाधिकार्यांनी पुढील माहिती दिली. इतिहासातील उपलब्ध दस्तऐवज आणि संशोधन यांनुसार गोव्यात इन्क्विझिशनच्या काळात हजारो हिंदूंवर धार्मिक अत्याचार करण्यात आले. अनेक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. हिंदूंच्या धार्मिक परंपरांवर बंदी घालण्यात आली आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. इतिहासकारांनीही आपल्या लिखाणामध्ये त्या काळातील अत्याचारांचा उल्लेख सविस्तरपणे केलेला आहे. विशेषतः इतिहासकार अनंत काकबा प्रियोळकर यांनी आपल्या ‘द इन्क्विझिशन’ या ग्रंथात इन्क्विझिशनमधील अमानुष शिक्षा प्रकार आणि धार्मिक दडपशाही यांचे विस्तृत वर्णन केले आहे. तसेच फ्रेंच वैद्य आणि प्रवासी चार्लस डेलोन यांनी स्वतः गोवा इन्क्विझिशनचा अनुभव घेतला असून त्यांच्या लिखाणात त्या काळातील अत्याचारांचे वर्णन आढळते.या पार्श्वभूमीवर ‘हिंदू एकता मंच, गोवा’च्या मागण्या
१. १६ मे हा दिवस ‘गोव्याच्या इतिहासातील काळा दिवस’ म्हणून अधिकृतपणे घोषित करावा.
२. गोवा इन्क्विझिशनचा सत्य इतिहास शालेय आणि महाविद्यालयीन पाठ्यपुस्तके यांमध्ये समाविष्ट करावा.
३. गोव्यात उद्ध्वस्त झालेल्या हिंदूची मंदिरे आणि पीडित हिंदु समाजाचा इतिहास सार्वजनिकरीत्या मांडवा.
४. गोव्यात ‘गोवा इन्क्विझिशन’ संग्रहालयाची स्थापना करावी.
५. पोप यांनी इन्क्विझिशनविषयी गोमंतकीय हिंदूंची जाहीर माफी मागावी.
६. १६ मे रोजी सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी अंगावर काळी पट्टी बांधून किंवा काळे वस्त्र परिधान करून घटनेचा निषेध करावा.
७. सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी आपल्या सोशल मीडिया ‘डीपी’ काळ्या रंगाची ठेवून या ऐतिहासिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा.
८. सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी समाजमाध्यमांच्या आधारे गोवा इन्क्विझिशनचा सत्य इतिहास जनतेपर्यंत पोहोचवावा.
इतिहास दडपून समाजात खरा सलोखा निर्माण होऊ शकत नाही. सत्य इतिहास स्वीकारणे आणि तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी लोकशाही आणि न्याय यांची पायरी आहे.

आपले विश्वासू,
हिंदू एकता मंच गोवा