हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या पणजी येथील पत्रकार परिषदेत मागण्या*_

_*

दिनांक : ३०.९.२०२६

_*हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या पणजी येथील पत्रकार परिषदेत मागण्या*_

*‘हात कातरो खांबा’चा इतिहास पाठ्यपुस्तकात लागू करा !*

*जुने गोवे येथील ‘इन्क्विझिशन हाऊस’च्या‘(व्हडलें घर) ठिकाणी उत्खनन करून इन्क्विझिशनचा काळाकुट्ट इतिहास जगासमोर आणा !*

पणजी, ३० सप्टेंबर – जुने गोवे येथील ऐतिहासिक ‘हात कातरो खांबा’चा इतिहास पाठ्यपुस्तकात लागू करावा आणि जुने गोवे येथील ‘इन्क्विझिशन हाऊस’च्या‘(‘व्हडलें घर’च्या) ठिकाणी उत्खनन करून इन्क्विझिशनचा काळाकुट्ट इतिहास जगासमोर आणावा, अशा मागण्या हिंदु राष्ट्र समन्वयसमितीने आझाद मैदान, पणजी येथे ३० सप्टेंबर या दिवशी सायंकाळी आयोजित केलेल्यापत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे सर्वश्री सत्यविजय नाईक, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी आणि सदस्य श्री. सत्यवान म्हामल; विश्व हिंदु परिषदेचे श्री. संजू कोरगावकर आणि श्री. कृष्णा मराठे; ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे श्री. रामदास सावईकर, वास्को येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. परशुराम गणाचारी, ‘हिंदु युवा शक्ती आणि गोवा’चे श्री. विनोद वारखंडकर यांची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत प्रारंभी ‘गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९७८’ अंतर्गत फोंडा येथील ‘मर्दनगड’ आणि जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ या ऐतिहासिक वास्तूंना अधिसूचना काढून संरक्षित स्थळांचा दर्जा दिल्याबद्दल समितीच्या वतीने गोवा सरकारचे अभिनंदन करण्यात आले.
*पत्रकार परिषदेत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. सत्यविजय नाईक म्हणाले,* ‘‘सध्या काही लोक जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ या नावाला आक्षेप घेऊन धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र अशा लोकांनी प्रथम ‘हातकातरो खांब’ याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना गेली २५ वर्षे ‘हातकातरो खांबा’ला संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठी निरनिराळ्या पद्धतीने कार्य करत होती. यासाठी गोव्यातील इतिहासतज्ञांनी पुष्कळ परिश्रम घेतले आहेत. आपल्या पूर्वजांनी या खांबाकडे अत्याचार सहन केले; पण आपला धर्म पालटला नाही. आमच्या पूर्वजांनी या खांबाकडे प्राणांची आहुती दिली. या खांबाला ऐतिहासिक महत्त्व असल्याने त्याचे संरक्षण होणे अत्यावश्यक आहे. ‘युनेस्को’ने जुने गोवे येथील अनेक स्थळे त्यांच्या सूचीत समाविष्ट केलेली आहेत, तर आता ‘हातकातरो खांबा’चा ‘युनेस्को’च्या सूचीत समाविष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. आमच्या स्वाभिमानी पूर्वजांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोचवण्यासाठी ‘हातकातरो खांबा’चा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा.’’
*गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी म्हणाले,* ‘‘खांबाचे नाव पालटण्याची मागणी म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न आहे. ‘हातकातरो खांबा’चे नाव पालटणे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि असा प्रयत्न झाल्यास राज्यभर याविरोधात आंदोलन छेडले ईल. ‘हात कातरो खांबा’च्या नावाविषयी कुणाला संशय वाटत असेल, तर त्यांनी स्वत:च्या ४ पिढ्यांमागचा इतिहास तपासून ते स्वत: कोण होते, ते तपासावे आणि नंतर त्यांच्या सत्य लक्षात येईल. शासनाने कोणत्याही दबावाखाली येऊ नये. सरकारने जुने गोवे येथे ‘व्हडलें घर’ (इन्क्विझिशन हाऊस’) आणि श्री महादेवाचे तीर्थक्षेत्र कुठे होते हे उत्खनन करून शोधून काढून इन्क्विझिशनचा काळाकुूट्ट इतिहास जगासमोर आणावा.’’
*वास्को येथील विश्व हिंदु परिषदेचे संजू कोरगावकर म्हणाले,* ‘‘खांबाचे नाव पालटणे म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान ठरेल. खांबाचे नाव पालटण्याची मागणी म्हणजे पोर्तुगिजांनी केलेला अत्याचार इतिहासातून पसून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. गोव्यात ‘इन्क्विझिशन’द्वारे हिंदूंचा नरसंहार करण्यात आला आहे आणि संपूर्ण जगातील ही सर्वंत मोठी घटना आहे. हा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोचला पाहिजे.’’
आपले विश्वासू,
*श्री. सत्यविजय नाईक*
हिंदु राष्ट्र समन्वय समिती (संपर्क क्रमांक : ९१५८९५४४५५)

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें