धर्मांतरविरोधी विधेयकाला गोव्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा

  • धर्मांतरविरोधी विधेयकाला गोव्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा
    सरकारने विरोधाला न जुमानता पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी विधेयक मांडावे ! – हिंदु जनजागृती समिती

    पणजी, ३१ ऑगस्ट – ‘गोवा अनधिकृत धर्मांतर प्रतिबंधक विधेयक, २०२६’ची गोव्यात आवश्यकता आहे. यामुळे गोव्यातील धर्मांतराला आळा बसणार आहे. गोवा सरकारने सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडावे. गोव्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विधेयकाला पठिंबा आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री गडेकर यांनी ३१ ऑगस्ट या दिवशी विधानसभा संकुलाबाहेर पत्रकारांना संबोधित करतांना केले. गोवा सरकारने विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील आमदार यांच्या मागणीनंतर धर्मांतरविरोधी विधेयक चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात न मांडता स्थगित ठेवण्याचा निर्णय ३१ ऑगस्ट या दिवशी सकाळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सौ. राजश्री गडेकर बोलत होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री विनोद वारखंडकर, अरविंद पानसरे, सौ. हेमश्री गडेकर आणि सौ. शुभा सावंत यांचा समावेश होता.
    सौ. राजश्री गडेकर पुढे म्हणाल्या,‘‘गोव्यात ‘बिलिव्हर्स’सारख्या संघटना हिंदूंच्या गरीबीचा अपलाभ उठवून आणि पैशांचे आमीष दाखवून धर्मांतर करत आहेत. गोव्यात ‘लव्ह जिहाद’च्या घटनाही वाढत आहेत. भारतीय संविधानाचे कलम २५ प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य नक्कीच देते, पण फसवणूक, बळजोरी किंवा आमीष दाखवून दुसर्‍याचे धर्मांतर करण्याचा परवाना कोणालाही देत नाही. खुद्द सरकारी आकडेवारीनुसार गोव्यात अशा अनधिकृत धर्मांतराचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. यासाठी सरकारने कोणत्याही दबावापुढे न झुकता हे विधेयक विधानसभेत मांडावे. त्यावर खुली चर्चा करून गोव्यातील जनतेच्या खर्‍या धर्मस्वातंत्र्याचे संरक्षण करावे’’.

    आपला विश्वासू,
    डॉ. मनोज सोलंकी,
    हिंदु जनजागृती समिती
    (संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)

    Photo Caption – हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन देताना.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें