जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

पणजी: जे. जी. पी. ज्वेलर्स यांनी २५ स्टोर्सच्या पूर्णत्वाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी खास ऑफर म्हणजेच ‘गोल्ड एक्स्चेंज फेस्टिवल’ जाहीर केला असून हा त्यांच्या या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे.सहा दशकांपासूनचा विश्वास, शुद्धता आणि सुंदर कारागिरीची परंपरा असलेले जे. जी. पी. ज्वेलर्स हे ग्राहकांचे दागिने खरेदीसाठीचे खात्रीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘गोल्ड एक्स्चेंज फेस्टिवल’ याचे प्रयोजन ग्राहकांना त्यांच्या जुन्या दागिन्यांपासून आजच्या नव्या काळातील आवडी निवडी प्रमाणे दागिने घडवणे आहे, शिवाय घडणावळीवर भरघोस सूट मिळणार आहे. त्याचबरोबर सोन्याच्या शुद्धतेची तपासणी व तज्ञांच्या मार्गदर्शनाने ही ‘गोल्ड एक्स्चेंज’ प्रक्रिया त्यांच्याकडील कॅरेटमिटरच्या सहाय्याने सोन्याच्या गुणवत्तेनुसार योग्य दर देईल यात शंका नाही.या फेस्टिवल बद्दल बोलताना, सानिका पेडणेकर, क्रिएटिव्ह डायरेक्टर, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स म्हणाल्या: “सहा दशकांपासून जे. जी. पी. ज्वेलर्स ग्राहकांच्या सर्वात जिव्हाळ्याच्या क्षणांचा आणि कौटुंबिक परंपरांचा एक भाग राहिली आहे. घरोब्याचे संबंध असलेल्या अनेक ग्राहकांच्या लेकी आजी-पणजीचे दागिने आता जुन्या स्टाइलचे झाले म्हणून मोडून नवीन करून घेतात. याच अनुभवाने या २५ दुकानांच्या टप्प्यावर, ‘गोल्ड एक्स्चेंज’ फेस्टिवलच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या जुन्या दागिन्यांना मॉडर्न स्टाईल अनुसार घडवण्याचा आणि ग्राहकांना खुष करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”






