सम्राट क्लब पर्वरी तर्फे मराठी रंगभूमी दिन साजरा
कला आणि कलाकार समाजासाठी खूप काही करतात. कला आपल्याला आपल्या सभोवतांच्या जगाकडे किंवा समाजाकडे पाहण्याचा एक नवीन मार्ग दाखवते. कला ही जगण्यासाठी आणि जगण्यासारखी आहे. असे मत सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बस्तोडा गावचे माजी सरपंच व “बस्तोडचा राजा” म्हणून प्रसिद्ध असलेला बस्तोडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रणजीत रामा उजगावकर यांनी व्यक्त केले.
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सम्राट क्लब पर्वरीतर्फे दि. ६ नोव्हेंबर संध्या. ७.०१ वा. सत्पुरुष बांदेश्वर देवस्थान सभागृह बस्तोडा गोवा. येथे प्रसिद्ध रंगकर्मी श्री हनुमंत तातू पेडणेकर यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य १ चे कार्यक्रम संचालक सम्राट सर्वेश फुलारी, सम्राट क्लब पर्वरीचे नूतन अध्यक्ष सम्राट अनुज हरमलकर, सचिव सम्राट दिनेश तारे, खजिनदार सम्राट तातू कुडाळकर, प्रकल्प संचालक सम्राट देविदास नेतार्डेकर, माजी अध्यक्ष सम्राट रिया राणे आदी उपस्थित होते.
क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष सम्राट अनुज हरमलकर यांनी स्वागताचे भाषण केले, स्थानिक कलाकार विनोद तोरस्कर, रोशन साळगावकर, दीपेश मणेरीकर यांच्यातर्फे नाट्यगीत, भावगीत व कु. धानिका दत्तराज केरकर तर्फे नृत्य कलेचा कार्यक्रम व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सम्राट दिव्या नेतार्डेकर हिने प्रमुख अतिथींना व सम्राट मोहिनी कोरगावकर यांनी विशेष अतिथींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर सम्राट व्येंकटेश नाईक यांनी प्रमुख पाहुणे, सम्राट प्रांजली पालेकर हिने प्रमुख अतिथी व सम्राट देविदास नेतार्डेकर यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. सम्राट रश्मी हळदणकर हिने मानपत्राचे वाचन केले. सम्राट क्लब पर्वरीच्या महिलां तर्फे उपस्थित मान्यवरांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध नाट्य लेखक श्री ध्रुव साबा कुडाळकर व प्रसिद्ध नाट्यकलाकार संदीप कवळेकर तर्फे सत्कारमूर्तीचे मनोगत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सम्राट व्यंकटेश नाईक यांनी केले तर सचिव सम्राट दिनेश तारे यांनी आभार मानले.






