सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटकातील उडुपी येथे २९ नोव्हेंबरला ऐतिहासिक ‘श्री महाधन्वंतरी याग’
पणजी, २८ नोव्हेंबर – आरोग्यसंपन्न समाज, राष्ट्ररक्षण आणि लोककल्याण या संकल्पाने सनातन संस्थेच्या वतीने भगवान श्रीकृष्णाची पावन नगरी असलेल्या उडुपी (कर्नाटक) येथे एम.जी.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर २९ नोव्हेंबर २०२६ या दिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत भव्य ‘श्री महाधन्वंतरी याग’ आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक यागाचे प्रमुख आकर्षण म्हणजे १,००० वर्षांचा इतिहास लाभलेल्या प्राचीन ‘सोरठी सोमनाथ ज्योतिर्लिंगा’च्या पवित्र अवशेषांचे दुर्लभ सार्वजनिक दर्शन होय. या यागासाठी १५,००० हून अधिक भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती सनातन संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
जागतिक संघर्ष, महामारी आणि हवामान पालट यांच्या सध्याच्या काळात संपूर्ण मानवजातीचे आरोग्य आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी वेदमंत्रांसह सामूहिक संकल्पाने भगवान श्री धन्वंतरी यांची आराधना करणे अत्यंत आवश्यक आहे. २९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता यज्ञाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी जिज्ञासूंनी https://youtube.com/live/ SuSTL2-Cafc या लिंकवर जोडावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.






