फिलिप्स होम अप्लायन्सेसकडून सणासुदीच्या खरेदीसाठी ‘सोने पे डबल सुहागा’ ऑफर, दर तासाला सोने आणि दररोज हिरे जिंकण्याची सुवर्णसंधी

फिलिप्स होम अप्लायन्सेसकडून सणासुदीच्या खरेदीसाठी ‘सोने पे डबल सुहागा’ ऑफर, दर तासाला सोने आणि दररोज हिरे जिंकण्याची सुवर्णसंधी

पणजी: गेल्या सणासुदीच्या हंगामातील आपल्या ‘सोने पे सुहागा’ मोहिमेला मिळालेल्या भरघोस यशानंतर फिलिप्स होम अप्लायन्सेस आता अधिक भव्य ‘सोने पे डबल सुहागा’ या सणासुदीच्या संकल्पनेसह पुन्हा सज्ज झाली आहे. सणासुदीच्या काळात दिलेले आश्वासन आणखी एक पाऊल पुढे नेत ही मोहीम ग्राहकांना पात्र फिलिप्स होम अप्लायन्सेसच्या खरेदीवर खात्रीशीर भेटवस्तू देण्यासोबत दर तासाला ९,९९९ रुपये किमतीचे सोने आणि दररोज ५०,००० रुपये किमतीचा हिरा जिंकण्याची उत्साहवर्धक संधी देऊन सणासुदीच्या खरेदीचा आनंद अधिक उत्साहित करते.

गेल्या वर्षी ‘सोने पे सुहागा’ मोहिमेने ७० शहरांमध्ये ग्राहकांसाठी नवा अनुभव तयार करत पारंपरिक सणासुदीच्या ऑफर्सच्या पलीकडे झेप घेतली होती. या मोहिमेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासह फिलिप्स होम अप्लायन्सेसने यंदा ही संकल्पना अधिक व्यापक केली आहे, ज्यामध्ये खात्रीशीर भेटवस्तू आणि मौल्यवान बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी एकत्र आणून ग्राहकांसाठी सणांची खरेदी अधिक फायदेशीर बनवली आहे.

ग्राहक आता विचारपूर्वक खरेदीचे निर्णय घेत असल्यामुळे ‘सोने पे डबल सुहागा’ मोहिमेचा उद्देश सणासुदीच्या खरेदीच्या अनुभवात अधिक आनंद आणि उत्साह निर्माण करणे हा आहे. नेहमीच्या सवलती आणि साध्या उत्पादन ऑफर्सच्या पलीकडे जाऊन फिलिप्स होम अप्लायन्सेस ग्राहकांना पात्र उत्पादनांच्या खरेदीवर खात्रीशीर भेटवस्तूंसोबत सोने आणि हिरे जिंकण्याची, तसेच काहीतरी खरोखर खास अनुभवण्याची संधी देत आहे. सणासुदीच्या काळात घरात फिलिप्सचे अप्लायन्स आणणे हा ग्राहकांसाठी आणखी लाभदायी अनुभव ठरावा आणि सण साजरा करण्यासाठी अधिक कारणे मिळावी, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

११ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालणारी ही मोहीम ११२ शहरांमधील २०० दशलक्षहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. या कालावधीत किमान १,५०० रुपये एमआरपी असलेली पात्र फिलिप्स होम अप्लायन्सेस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खरेदीवर खात्रीशीर भेटवस्तू मिळेल, तसेच दर तासाला ९,९९९ रुपये किमतीचे सोने किंवा दररोज ५०,००० रुपये किमतीचा हिरा जिंकण्याची संधी मिळेल. भारतातील सणांच्या परंपरेत सोने आणि हिऱ्यांना विशेष स्थान आहे, जे समृद्धी, सौभाग्य, आनंदोत्सव आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानले जातात. या मौल्यवान बक्षिसांचा ग्राहकांच्या अनुभवात समावेश करून फिलिप्स होम अप्लायन्सेस सणासुदीच्या खरेदीचा आणि अनपेक्षित बक्षिसांचा आनंद एकत्र आणत आहे, तसेच पात्र उत्पादनांवर खात्रीशीर भेटवस्तू देऊन ग्राहकांना अधिक मूल्य प्रदान करत आहे.

या मोहिमेबाबत मत व्यक्त करत वर्सुनी इंडियाच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पूजा बैद म्हणाल्या, “गेल्या वर्षी ‘सोने पे सुहागा’ला मिळालेल्या प्रतिसादावरून आम्हाला निदर्शनास आले की, ग्राहक पारंपरिक ऑफर्सच्या पलीकडे जाऊन सणासुदीच्या आगळ्यावेगळ्या अनुभवांना पसंती देतात. यंदा खात्रीशीर मूल्य आणि काहीतरी विशेष जिंकण्याचा आनंद एकत्र आणणाऱ्या संकल्पनेसह त्या प्रतिसादाला आणखी पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न होता. ‘सोने पे डबल सुहागा’च्या माध्यमातून पात्र फिलिप्स होम अप्लायन्सेस खरेदी करणारे ग्राहक खरेदीवर खात्रीशीर भेटवस्तू मिळवू शकतात, तसेच दर तासाला सोने आणि दररोज हिरा जिंकण्याची संधीही मिळवू शकतात. वर्षातील या आधीच खास असणाऱ्या काळात आनंद, अनपेक्षित सरप्राइज आणि महत्त्वाकांक्षांची भर घालून सणासुदीची खरेदी अधिक लाभदायी बनवणे हाच आमचा उद्देश आहे.”

‘सोने पे डबल सुहागा’ मोहिमेसह, फिलिप्स होम अप्लायन्सेस घरांचे रूपांतर सुंदर होममध्ये करण्याच्या आपल्या मूळ उद्देशाशी बांधील राहून ग्राहकांशी सणासुदीचे नाते सातत्याने अधिक दृढ करत आहे. दर्जेदार होम अप्लायन्सेसच्या पोर्टफोलिओसोबत खात्रीशीर भेटवस्तू आणि मौल्यवान बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी देऊन ही मोहीम देशभरातील ग्राहकांसाठी सणासुदीची खरेदी अधिक उत्साहवर्धक आणि फायदेशीर बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें