मर्दनगड ’ आणि ‘हात कातरो खांब’ संरक्षित स्मारके घोषित केल्याचे प्रकरण हिंदु जनजागृती समितीने मंत्री सुभाष फळदेसाई आणि आमदार दाजी साळकर यांचे केले अभिनंदन

मर्दनगड ’ आणि ‘हात कातरो खांब’ संरक्षित स्मारके घोषित केल्याचे प्रकरण
हिंदु जनजागृती समितीने मंत्री सुभाष फळदेसाई आणि आमदार दाजी साळकर यांचे केले अभिनंदन
फोंडा, २४ सप्टेंबर – गोवा सरकारने ‘गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९७८’ अंतर्गत फोंडा येथील ‘मर्दनगड’ आणि जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ या ऐतिहासिक वास्तूंना अधिसूचना काढून संरक्षित स्थळांचा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘मर्दनगड संरक्षण समिती’ यांच्या पदाधिकार्‍यांची ‘मर्दनगड’ अधिसूचित करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे तत्कालीन पुरातत्त्व खात्याचे मंत्री तथा विद्यमान समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि वास्कोचे आमदार श्री. कृष्णा उपाख्य दाजी साळकर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या वेळी हिंदु जनजागृती समिचीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, समितीचे गोवा राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक, ‘मर्दनगड संवर्धन समिती’चे सर्वश्री राजेंद्र देसाई, नारायण नाडकर्णी, मनोज गावकर, सूचेंद्र अग्नी आणि स्वप्नील नाईक यांची उपस्थिती होती.
गोव्याचे तत्कालीन पुरातत्व खात्याचे मंत्री तथा विद्यमान समाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी गोवा विधानसभेत ८ ऑगस्ट २०२५ या दिवशी ऐतिहासिक मर्दनगडाचे संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी तो अधिसूचित करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती.  वास्कोचे आमदार श्री. कृष्णा उपाख्य दाजी साळकर यांनी मांडलेल्या ठरावावर मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी ही घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार दाजी साळकर आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांचे अभिनंदन करण्यात आले. या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्याचा सरकारचा प्रयत्न स्तुत्य आहे आणि आता या ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन अन् विकास कर�

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें