डॉ. गुरुदास नाटेकर यांचा सम्राट क्लब इंटरनॅशनलच्या राज्य परिषदेत विशेष सत्कार

थिवि वाताहार
डॉ. गुरुदास नाटेकर यांचा सम्राट क्लब इंटरनॅशनलच्या राज्य परिषदेत विशेष सत्कार
सम्राट क्लब इंटरनॅशनल (राज्य १) आणि यजमान ‘सम्राट क्लब पर्वरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक राज्यस्तरीय परिषदेच्या  उद्घाटन सोहळ्यात डॉ. गुरुदास नाटेकर यांचा त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष बहुमान व सत्कार करण्यात आला. हा सोहळा  सुकूर  पंचायत सभागृह, पर्वरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून श्री. सागर गोवेकर (मॅनेजिंग डायरेक्टर, इथरनेट एक्स्प्रेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), मानद अतिथी सम्राट  ॲड. अवधूत सलत्री  (अध्यक्ष, सम्राट क्लब इंटरनॅशनल), मुख्य वक्ते सम्राट संदीप निगळ्ये (कार्याध्यक्ष, सम्राट क्लब इंटरनॅशनल) आणि सम्राट शशिकांत पुनाजी (राज्य अध्यक्ष तथा अध्यक्ष-राज्य परिषद) यांच्यासह सम्राट क्लबचे अनेक मान्यवर अधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सम्राट  ॲड. अवधूत सलत्री यांच्या  हस्ते डॉ. गुरुदास नाटेकर यांना शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला तसेच सम्राट क्लबच्या सांस्कृतिक व सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी डॉ. नाटेकर यांच्या भावी आयुष्यासाठी व कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
फोटो कॅप्शन :  डॉ. गुरुदास नाटेकर यांचा सत्कार करताना याप्रसंगी सम्राट  ॲड. अवधूत सलत्री, बाजूला इतर मान्यवर

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें