सनातनच्या वतीने गोव्यात ७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न! ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही!  – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

सनातनच्या वतीने गोव्यात ७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न!
‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही!  – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

पणजी, २९ जुलै – ‘‘संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसर्‍या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी आता पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर आधारित ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता आहे. हे रामराज्य केवळ राजकीय किंवा भौतिक प्रयत्नांतून साकार होणार नाही, तर त्यासाठी समाजाला ‘साधनेचे’ आणि ‘गुरुचरणांचे’ भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान असणे अनिवार्य आहे,’’ असे ओजस्वी प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीने राज्य समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने क्षात्रतेज सभागृह, पर्वरी येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवात’ प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते. यंदा संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, तेलुगु, मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात ८१ ठिकाणी, तर गोव्यात ७ ठिकाणी हा महोत्सव संपन्न झाला.
आगामी जागतिक युद्धाचे आणि आपत्काळाचे सावट पहाता, हिंदूंनी प्रथमोपचार, अग्नीशमन आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले. पर्वरी येथील महोत्सवात जगद्गुरू श्री रामानंदाचार्य श्रीमद नरेंद्राचार्य स्वामीजी यांचे शिष्य श्री. राजीव कुडके प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थिती होती. श्री. राजीव कुडके या वेळी आपल्या मार्गदर्शनात सद्गुरूंची महती विषद केली. सद्गुरूंना शरण गेल्यास मनुष्याला जीवनात चिंता करण्याची आवश्यकता भासत नसल्याचे ते पुढे म्हणाले. या महोत्सवात प्रारंभी श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश वाचन, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप भावपूर्णरित्या करण्यात आला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ देश-विदेशांतील हजारो भाविकांनी घेतला.
आपला नम्र
श्री. तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था
(संपर्क क्रमांक : ९३७०९ ५८१३२)
Photo caption – गोवा क्षत्रिय मराठा समाज सभागृह, पर्वरी गुरुपौर्णिमा महोत्सवात पूजनासाठी बसलेले दांम्पत्य  श्री. दिलीप गजानन नाईक, सौ. समिता दिलीप नाईक. पौराहित्य  वेदमूर्ती श्री. प्रदीप जोशी

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें