_
दिनांक : १७.७.२०२६
*विरोधकांच्या दबावाला सरकारने बळी पडू नये, निर्णयाचा फेरविचार करावा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समिती*
पणजी, १७ जुलै – शिक्षण खात्याने शाळा व महाविद्यालये यांमध्ये ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ (एस्.आय.ओ.) किंवा तत्सम बाह्य संस्था यांच्या कार्यक्रमांबाबत कठोर मार्गदर्शक तत्त्वे असलेले परिपत्रक मागे घेतले आहे. वास्तविक ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ (एस्.आय.ओ.) या संघटनेच्या विविध शैक्षणिक संस्थांमधील उपक्रम गंभीर स्वरूपाचे आहेत. या संघटनेने गोव्यातील शाळांमध्ये ‘मशिद दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हिंदु विद्यार्थ्यांना मशिदमध्ये नेऊन त्या ठिकाणी इस्लामिक पद्धतीने ‘बुरखा बालणे, नमाज पडणे, वाजू करणे यांसारख्या कृती करण्यास भाग पाडले होते. दोन दिवसांपूर्वी भाग्यनगर (हैद्राबाद) येथे एका मुसलमान शिक्षकेने शाळेतील बहुसंख्य हिंदु विद्यार्थ्यांना ‘कलमा’ लिहून आणण्याचा गृहपाठ दिला होता. अशा घटना वारंवार घडत आहेत. वास्तविक विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कट्टरवाद, राष्ट्रविरोधी किंवा समाजविघातक विचार रुजू नयेत, यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये अशा संघटनांना प्रवेश बंदी करणे योग्य होते; मात्र राजकीय लाभापोटी विरोधी राजकीय पक्षांनी या परिपत्रकाला विरोध केला. सरकारने या दबावाला बळी पडणे हे दुर्दैवी आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा आणि धार्मिक तेढ निर्माण करणार्या उपक्रमांना विद्यालयांमध्ये स्थान देऊ नये, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती करत आहे.
आपला विश्वासू,
*श्री. सत्यविजय नाईक,*
हिंदु राष्ट्र समन्वय समिती,
(संपर्क क्रमांक : ९१५८९५४४५५)






