म्हार्दाेळ येथे राज्यस्तरीय मंदिर परिषद*_ *मंदिरांवरील आघात रोखण्यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती

_

दिनांक : ३१.५.२०२६

_*म्हार्दाेळ येथे राज्यस्तरीय मंदिर परिषद*_

*मंदिरांवरील आघात रोखण्यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती*

म्हार्दाेळ, ३१ मे – मंदिरांच्या प्रतिनिधीने आपले दायित्व समजून घेतले पाहिजे. आज मंदिर विश्वस्तांना संघटीत होण्यासाठी सातत्याने का सांगावे लागत आहे? गोमंतकात परकीय आक्रमकांनी मंदिरे नष्ट करण्याचे प्रयत्न केले आणि आपल्या पूर्वजांनी प्राणपणाने लढून येथील मूर्ती, मंदिरे यांचे रक्षण केले. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊच शकत नाही असे आपण कसे म्हणू शकतो? महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूूलन अधिनियम -२०२६’ येऊ घातला आहे. या कायद्यामुळे मंदिरांची भूमी नाहीसी होणार आहे. मंदिराच्या रक्षणासाठी सरकार आमचे असले, तरीही कायदा रहित होईपर्यंत आम्ही लढणार आहोत. देवाच्या नावावरची भूमी कुठल्याही सरकारला काढून घेण्याचा अधिकार नाही. मंदिरांवरील आघात रोखण्यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. गोमंतक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंदिर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलतांना केले. या वेळी व्यासपिठावर सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव, ह.भ.प. सुहास वझे, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी आणि श्री महालसा देवस्थानचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद कामत यांची उपस्थिती होती.
परिषदेचे शंखनाद करून, तसेच सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव, ह.भ.प. सुहास वझे आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी वेदमंत्रपठण केले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म जयंत बाळाजी आठवले यांचे मंदिर परिषदेसाठीच्या ‘राष्ट्र आणि धर्म रक्षण यांच्यासाठी मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन अपरिहार्य’ या विषयावरील संदेशाचे सौ. गौरी नायक यांनी वाचन केले. श्रीक्षेत्र, तपोभूमी येथील श्री दत्त पद्मनाभ पीठ येथील पिठाधिपती पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे मंदिर परिषदेसाठीचे संदेशाचे ‘स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकूल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट श्री क्षेत्रतपोभूमी गुरुपीठा’चे प्रधानाचार्य वेदमूर्ती अनुप शांताराम शेलार यांनी वाचन केले. गोमंतकीयांसाठी दिशादर्शक असलेले आणि देव, देश अन् धर्म रक्षण यांसाठी कार्यरत असलेल्या म्हापसा येथील ‘हिंदु युवा शक्ती’च्या कार्याचा मंदिर परिषदेमध्ये गौरव करण्यात आला. या वेळी ‘श्री संप्रदाया’चे श्री. राजीव कुडके यांनी या वेळी जुने गोवे येथे संप्रदायाने उभारलेल्या भव्य श्री गोवेश्वर मंदिराची माहिती उपस्थितांना दिली. गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी यांनी या वेळी महासंघाच्या कार्याची माहिती देतांना मंदिरातून धार्मिक शक्ती जागृत होणे आवश्यक असल्याचे म्हटले. गणेशोत्सवाला राज्यस्तीय धार्मिक उत्सवाची मान्यता देणे, गोव्यात धर्मांतरविराेधी कायदा करणे, मंदिरच्या सभोवताील मद्यविक्री बंद करणे आणि मद्यालयांना हिंदु देवतांची नावे देण्यावर प्रतिबंध आणण्ो अशा गोमंतक मंदिर महासंघाच्या मागण्या असल्याचे ते म्हणाले. ह.भ.प. सुहास वझे यांनी ‘भक्तांनी मंदिराशी जोडण्यासाठी करायचे प्रयत्न’ या विषयावर मार्गदर्शन करतांना प्रत्येकाने देवाला काय आवडते हे पहावे असे म्हटले. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘मंदिर विश्वस्तांसाठी काळानुसार साधना’ या विषयावर मार्गदर्शन करताना शास्त्र समजून देवतेचे दर्शन घेतल्यास त्याचा अधिकाधिक लाभ होणार असल्याचे म्हटले. सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांनी ‘मंदिर- धर्मप्रसाराचे काळानुसार केंद्र बिंदू’ याविषयी माहिती दिली. परिषदेच्या सायंकाळच्या सत्रात ‘मंदिर विश्वास्तांना येणार्‍या कायदेशीर आणि अन्य अडचणी’, याविषयावर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संतोष रिवणकर आणि अधिवक्ता श्री. सुनिल सिरसाट यांनी मार्गदर्शन केले. या वेळी अनेक मंदिर विश्वस्तांनी प्रश्न विचारून आपले शंकानिरसन करून घेतले. परिषदेत सायंकाळच्या सत्रात ‘मंदिर महासंघ संघटन दिशा’, ‘मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्र कशी करावीत’, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली, तसेच उपस्थित मान्यवरांनी याविषयावर मार्गदर्शन केले. परिषदेच्या समारोम समारंभाच्या मंदिराच्या रक्षणासाठी विविध ठराव घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रोहन देसाई आणि सौ. गौरी नायक यांनी केले.

*राज्यस्तरी मंदिर परिषदेत संमत झालेले ठराव*
१. मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिर परिसरात १०० मटिर अंतरात मद्य आणि मांस विक्री केंद्रांवर बंदी आहे. या कायद्याची त्वरित कार्यवाही करावी आणि यामध्ये कोणताही प्रकारची सुट देऊ नये.
२. मद्यालयांना हिंदु देवतांची नावे देण्यास प्रतिबंध करणारा कायदा पारित करावा.
३. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर पुढाकार घ्यावा.
४. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा द्यावा.
५. हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा पारित करावा.
६. जत्रोत्सवात मंदिर परिसरात अन्य धर्मियांना स्टॉल लावण्यास प्रतिबंध करावा.
७. मंदिर समितीमध्ये महिलांनाही प्रतिनिधी म्हणून स्थान द्यावे.
८. मंदिराचा पावित्र्य टीकवण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करावी
९. मंदिराच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी धर्महानी करणारे कार्यक्रम ठेवू नये.

*राज्यस्तरी मंदिर परिषदेची फलनिष्पत्ती*
१. ३९ मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचे निश्चित केले आहे.
२. २९ मंदिरांनी तालुकास्तरावर बैठका आयोजित करण्याचे ठरवले आहे.
३. ३० मंदिरांमध्ये धर्मशिक्षणाचे फलक लावण्याचे ठरवले आहे.
४. २६ मंदिरांमध्ये धर्मजागृतीपर व्याख्यानाचे आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे.
५. २८ मंदिरांमध्ये धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याचे ठरवले आहे.
६. २१ मंदिरांमध्ये सामूहिक आरती चालू करण्याचे ठरवले आहे.
७. परिषदेत उपस्थित सर्वांनी मंदिराच्या १०० मीटर परिसरात मद्य आणि मांस विक्री बंद करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.

आपला नम्र
*श्री. जयेश थळी,*
गोमंतक मंदिर महासंघ
(संपर्क क्रमांक : ९५२७७ ६००६१)

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें