अमली पदार्थ व्यवसायामध्ये अल्पवयीनांचा सहभाग
सरकारने कडक धोरण राबवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक ! – हिंदु जनजागृती समिती
पणजी, १५ एप्रिल – राज्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने नुकत्याच केलेल्या अन्वेषणात दोन निरनिराळ्या अमली पदार्थ प्रकरणांमध्ये ३ अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. सरकारने अल्पवयीनांना अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी तातडीने कडक धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक ठरत आहे.
अमली पदार्थ व्यवहारामध्ये अल्पवयीनांचा सहभाग असणे ही एक चिंतेची बाब आहे. याला आळा घालण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये येथे अमली पदार्थाच्या विरोधात विशेष तपास मोहीम राबवणे आणि अमली पदार्थाच विरोधात जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करणे, ‘ज्युवीनाईल जस्टीस ॲक्ट’ची कडक अंमलबजावणी करणे, अमली पदार्थविरोधी कायद्याच्या अंतर्गत अमली पदार्थ व्यावसायिकांवर कठोर कारवाई करणे, नागरिकांना सहज माहिती देता यावी यासाठी २४ तास हेल्पलाईन चालू करणे, अमली पदार्थाचा व्यवसाय होत असलेल्या संभाव्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, आदी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. सरकार या प्रकरणांमध्ये गंभीरतेने पाहिल, अशी अपेक्षा आहे.आपला नम्र,
डॉ. मनोज सोलंकी,राज्य समन्वयक, गोवा,
हिंदु जनजागृती समिती, संपर्क क्रमांक – ९३२६१०३२७८