गोव्यामध्ये ३० वर्षांवरील ७० टक्‍क्‍यांहून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली, स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीत ऐतिहासिक टप्‍पा गाठला

गोव्यामध्ये ३० वर्षांवरील ७० टक्‍क्‍यांहून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली, स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीत ऐतिहासिक टप्‍पा गाठला

आरोग्यमंत्री श्री. विश्वजित राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा उपक्रमांतर्गत स्तनाच्या कर्करोगासाठी २ लाखांहून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली; २०२७ पर्यंत वयोमर्यादेत बसणाऱ्या सर्व महिलांची तपासणी करण्याचे राज्याचे उद्दिष्ट

पणजी: स्तनाचा कर्करोग ही भारतातील महिलांमध्ये सार्वजनिक आरोग्याची मोठी समस्या ठरत असताना, गोवा राज्य स्तनाच्या कर्करोगाची तपासणी रुग्णालयांच्या पलीकडे नेऊन थेट समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत आहे. एसबीआय फाऊंडेशन आणि युवराज सिंग फाऊंडेशनच्या (यूवीकॅन) सहयोगाने स्वस्थ महिला,स्वस्थ गोवा उपक्रमाद्वारे आणि गोव्याचे माननीय आरोग्यमंत्री श्री. विश्वजित राणे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आयब्रेस्टएक्झामचा वापर करून राज्यभरात स्तन तपासणीची व्याप्ती वाढवण्यासाठी गोवा सरकार कार्यरत आहे.ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश तपासणी सेवा थेट समुदायांपर्यंत पोहोचवून आणि त्या राज्याच्या विद्यमान आरोग्य यंत्रणेशी जोडून संपूर्ण गोव्यातील महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी अधिक सुलभ बनवणे हा होता.आता ६ व्या वर्षात पदार्पण करत असताना या उपक्रमाने आतापर्यंत २.१५ लाखांहून अधिक महिलांची तपासणी केली आहे, ज्यामध्ये पुढील चाचणी आणि वैद्यकीय मूल्यांकनासाठी ३,७०० हून अधिक गाठी (लम्प्स) आढळून आल्या आहेत. आता आयब्रेस्टएक्झाम उपकरणांच्या मदतीने या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात आणखी ५०,००० महिलांची तपासणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, तसेच २०२७ अखेरपर्यंत गोव्यातील वयोमर्यादेत बसणाऱ्या सर्व महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.

गोव्याचे माननीय आरोग्यमंत्री श्री. विश्वजित राणे म्हणाले, “व्यक्तींनी रुग्णालयात येण्याची वाट पाहण्यापेक्षा आरोग्यसेवा थेट त्यांच्या घरापर्यंत नेणे हा नेहमी आमचा दृष्टिकोन राहिला आहे. ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’च्या माध्यमातून आम्ही गेल्या ५ वर्षांपासून राज्यभरातील महिलांकरिता स्तन तपासणी अधिक सुलभ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून गोव्यातील वयोमर्यादेत बसणाऱ्या सर्व महिलांपर्यंत पोहोचणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”हा उपक्रम प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक दृढ करण्यावर आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर गोव्याच्या व्यापक धोरणाचा भाग आहे. ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ उपक्रम थेट समुदायांमध्ये नेऊन अशा महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्या कदाचित स्वतःहून तपासणीसाठी येत नाहीत किंवा ज्यांच्यापर्यंत सार्वजनिक आरोग्य सेवा सहज उपलब्ध होत नाहीत.

गोवा मेडिकल कॉलेजचे डीन प्रा. डॉ. जय प्रकाश तिवारी म्हणाले, “तपासणी मोहीम अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते, तेव्हा मोहिमेचा प्रभाव अधिक व्यापक ठरतो. ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रेफरल प्रक्रिया प्रबळ करत महिलांच्या दारापर्यंत स्तन तपासणी सेवा पोहोचवण्यास मदत केली आहे. ३५ ते ६४ वयोगटातील १ लाखांहून अधिक महिलांचा समावेश असलेल्या मुंबईतील २० वर्षांच्या यादृच्छिक चाचणीत दिसून आले की, तिसऱ्या किंवा चौथ्या स्‍टेजमधील स्तनाचा कर्करोग निदान होण्याचे प्रमाण नियंत्रण गटातील ४७ टक्क्यांवरून तपासणी झालेल्या गटामध्ये ३७ टक्क्यांपर्यंत खाली आले. गोवा सरकारचे माननीय आरोग्यमंत्री श्री. विश्वजित राणे यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला आमच्या उपक्रमात असेच यश पाहायला मिळाले आहे, ज्यामुळे आम्हाला सुरुवातीच्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान करणे शक्य झाले. संपूर्ण गोव्यातील अधिकाधिक महिलांपर्यंत हा प्रयत्न नेण्याची आम्हाला आशा आहे. जनजागृतीपासून ते सुरुवातीच्या टप्प्यातील निदान आणि उपचारांपर्यंत, ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ उपक्रमाने कर्करोग उपचारात सुधारणा करून थेट समुदायांमध्ये जनजागृती निर्माण केली आहे.”

‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ उपक्रमांतर्गत सरकारी आरोग्य केंद्रे, आउटरीच उपक्रम आणि समुदाय उपक्रमांद्वारे स्तनाच्या कर्करोगाची तपासणी केली जात आहे. हा उपक्रम आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि पुढील तपासणीची गरज असलेल्या महिलांसाठी सुलभ रेफरल प्रक्रियेवरही लक्ष केंद्रित करतो.

डॉ. अनुपमा बोरकर म्हणाल्या, “या उपक्रमाद्वारे आम्ही दोन लाख पंधरा हजार महिलांची तपासणी केली आहे, ज्यामध्ये ३,९२५ संशयित लक्षणे आढळली आणि ९६ कर्करोग निष्पन्न झाले. पण, या प्रत्येक आकड्यामागे एक महिला आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यात निदान झालेल्या प्रत्येक कर्करोगामागे एक जीवन वाचवण्याची संधी आहे. गोवा सरकारचे माननीय आरोग्यमंत्री श्री. विश्वजित राणे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि गोवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहयोगाने आम्ही रुग्णांवर वेळेवर उपचार करू शकलो. भारतातील पुरावे (पबमेड सेंट्रल (पीएमसी)) दर्शवतात की, तपासणीमुळे स्तनाच्या कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात करता येते आणि जगण्याचा दर वाढू शकतो. गोव्याने हे संशोधन प्रत्यक्षात आणत ३० वर्षांवरील जवळपास ८० टक्‍के महिलांपर्यंत पोहोच साध्य केली आहे. ही केवळ तपासणीची व्याप्ती नसून लोकसंख्येच्या पातळीवर जीवन वाचवणारे सुरुवातीच्या टप्प्यातील निदान आहे.”

या उपक्रमाला एसबीआय फाऊंडेशन आणि युवराज सिंग फाऊंडेशनने (यूवीकॅन) पाठबळ दिले आहे, तसेच राज्यभरात स्तन तपासणीची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेची उपलब्धता अधिक वाढवण्यासाठी मदत केली आहे.

हा राज्यव्यापी उपक्रम आपल्या ६ व्या वर्षात पदार्पण करत असताना गोवा सरकारची नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण उपाय देण्याची कटिबद्धता दर्शवण्यासोबत राज्यातील प्रत्येक पात्र महिलेला सुरुवातीच्या टप्प्यातील निदान व उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने गोव्याला अधिक जवळ घेऊन जात आहे.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें