सीजेपी’च्या पणजी येथील आंदोलनात ‘हिंदुत्व मुर्दाबाद’च्या घोषणा देणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – ‘डिचोली हिंदु

 

दिनांक : १६.१०.२०२६

*‘सीजेपी’च्या पणजी येथील आंदोलनात ‘हिंदुत्व मुर्दाबाद’च्या घोषणा देणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – ‘डिचोली हिंदु

एकता’ संघटनेची डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार*
डिचोली, १६ ऑक्टोबर – कॉक्रोच जनता पार्टी’च्या (‘सीजेपी’च्या) पणजी येथे ११ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या आंदोलनात ‘हिंदुत्व मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्याचा व्हिडीओ सामाजिक माध्यमात प्रसारित झाला आहे. हिंदूंना लक्ष्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आणि गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा हा हेतुपूरस्सर केलेला प्रकार आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘डिचोली हिंदु एकता’ या संघटनेने डिचोली पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत केली आहे. ‘डिचोली हिंदु एकता’ संघटनेचे सर्वश्री कृष्णा मराठे, गोविंद चोडणकर आणि सुर्यकांत देसाई यांनी ही तक्रार नोंदवली आहे.


तक्रारीत ‘हिंदुत्व मुर्दाबाद’च्या घोषणा देणार्‍यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करणे, ‘सीजेपी’च्या अमरिन शेख आणि तिचे अन्य साथीदार यांचा यामागील भूमिका तपासून दायित्व निश्चित करणे, आयोजकांवर गुन्हा नोंद करणे आणि भविष्यात असे प्रकार न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्ो, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

आपला विश्वासू,
श्री. गोंविद चोडणकर
डिचोली हिंदू एकता

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें