हिंदु राष्ट्र समन्वय समितीची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

हिंदु राष्ट्र समन्वय समितीची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी|‘सीजेपी’च्या आंदोलनात ‘हेट स्पीच’, देशविरोधी व धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये टाळण्ो यांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा !

पणजी, ९  ऑक्टोबर – आझाद मैदान, पणजी येथे येत्या ११ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘सीजेपी’चे (कॉक्रोच जनता पार्टी’चे) आंदोलन होणार आहे. या आंदोलनात ‘हेट स्पीच’, देशविरोधी व धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये टाळणे, यांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. प्रवीण हिरे परब यांना देण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. प्रवीण हिरे परब यांनी या मागणीची त्वरित नोंद घेऊन पोलिसांना आवश्यक निर्देश दिले. या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘हिंदू युवा शक्ती’चे श्री. विनोद वारखंडकर, विश्व हिंदु परिषदेच्या मातृशक्ती विभाग प्रमुख सौ. सुजाता कामत आणि मातृशक्ती संयोजिका सौ. अक्षता वेर्लेकर अन् सौ. नीता मडकईकर, ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे श्री. जयेश थळी आणि श्री. सूजन नाईक, ‘स्वराज्य गोमंतक’ संस्थेचे श्री. सिद्धार्थ मांद्रेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांची उपस्थिती होती.हिंदु राष्ट्र समन्वय समिती निवेदनात म्हणते, ‘‘लोकशाही व्यवस्थेमध्ये शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र अधिकाराच्या नावाखाली गोव्यासारख्या शांतताप्रिय राज्याचे सामाजिक व धार्मिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न खपवून घेऊ नये. ‘सीजेपी’च्या नुकत्याच पणजी येथे झालेल्या एका आंदोलनात ‘अफजल तेरे कातिल जिंदा है, हमें चाहिए आजादी’, अशा प्रकारचे फलक प्रदर्शित केले होते. संसदेवर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्याचे उदात्तीकरण म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देण्यासारखे आहे. पणजी पोलिसांनी या वेळी संबंधितांवर त्वरित कारवाई केली होती. ११ ऑक्टोबरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांना प्रतिबंधात्मक नोटिसा पाठवून त्यांची जबाबदारी निश्चित करणे, संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रीकरण, ‘हेट स्पीच’ व देशविरोधी घोषणांवर ‘सुओ मोटो’ कारवाई करणे, समाजमाध्यमांवर (Social Media) सायबर सेलची नजर ठेवणे आणि आंदोलनस्थळी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवणे अशा मागण्या करण्यात आल्या.

आपले नम्र,
श्री. सत्यविजय नाईक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
(संपर्क क्रमांक – ९१५८९ ५४४५५)

Photo caption – उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. प्रवीण हिरे परब यांना निवेदन देतांना हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे शिष्टमंडळ

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें