_
दिनांक : २८.०८.२०२६
_*हिंदु जनजागृती समितीच्या साधिकांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमदार आणि मंत्री यांना बांधली राखी
*_
*गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्याची केली मागणी*
पणजी, २८ ऑगस्ट – हिंदु जनजागृती समितीच्या साधिकांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने राज्यातील विविध आमदार आणि मंत्री यांना राखी बांधून ‘गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा लागू होणे’, हीच आमच्यासाठी रक्षाबंधनाची ओवाळणी ठरेल त्यामुळे तो कायदा होण्यासाठी प्रयत्न करा’, अशी विनंती केली.
गोवा राज्य मंत्रीमंडळाने बळजोरीने, आमीष दाखवून, फसवणूक करून किंवा विवाहाच्या माध्यमातून होणार्या अवैध धर्मांतराला आळा घालण्यासाठी ‘गोवा कायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक विधेयक २०२६’ आणण्यास संमती दिली आहे. हे विधेयक आता ३१ ऑगस्टपासून चालू होणार्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे. गोव्यातील धर्मांतराची कीड समूळपणे नष्ट करण्यासाठी आमदार व मंत्री यांनी या विधेयकाला पाठिंबा द्यावा, ही विनंती करणारे पत्र मंत्री व आमदार यांना देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बरोबरच समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, पर्यटनमंत्री रोहन खवटे, भाजपचे मयेचे आमदार श्री. प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मगोपचे मांद्रेचे आमदार श्री. जीत आरोलकर, भाजपचे पेडणेचे आमदार श्री. प्रवीण आर्लेकर आणि भाजपचे आमदार श्री. उल्हास तुयेकर यांच्याबरोबरच केंद्रीय राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांना देण्यात आले.
आपला नम्र,
*डॉ. मनोज सोलंकी,राज्य समन्वयक, गोवा,*
हिंदु जनजागृती समिती, (संपर्क क्रमांक – ९३२६१०३२७८)






