पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’ या आत्मचरित्राचे प्रकाशन

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’ या आत्मचरित्राचे प्रकाशन

१९४ वर्षांच्या वारशाला नवी दिशा देणाऱ्या सहाव्या पिढीतील उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास

पणजी: भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित सराफी व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’चा वारसा वयाच्या मध्यतिशीत स्वीकारलेल्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव, संघर्ष, निर्णय आणि नेतृत्वाचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. त्यांचे आत्मचरित्र ‘चूजिंग गोल्ड’ हे पेंग्विन रँडम हाऊस इंडिया यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केले आहे. ‘चूजिंग गोल्ड’ हे अत्यंत प्रामाणिक आणि वैयक्तिक अनुभवांवर आधारित असे पुस्तक आहे. भारतातील सर्वात जुन्या व्यावसायिक वारशांपैकी एकाचा वारसा तरुण वयात स्वीकारल्यानंतर, आज वयाच्या एकोणपन्नाशीत डॉ. सौरभ गाडगीळ यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासाकडे मागे वळून पाहत त्यातील अनुभव, संघर्ष, निर्णय आणि शिकवणी यांचा प्रांजळ वेध घेतला आहे. हा प्रवास बाहेरच्या जगाला दिसणाऱ्या यशाचा नसून, त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या वास्तवाचा आणि त्यातून घडलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आहे.

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “आयुष्य जगताना स्वतःसाठी जो वेळ मिळतो, ज्यात आपण मागे वळून पाहतो, तशी संधी मला कधी मिळाली नाही. या पुस्तकाच्या निमित्तानं पहिल्यांदाच ही संधी मिळाली. स्वतःशी संवाद साधत अनेक प्रश्नांना या निमित्तानं मला सामोरं जाता आलं. आजपर्यंत मी घेतलेल्या कोणत्या निर्णयांचा मला खऱ्या अर्थानं अभिमान आहे? कोणत्या निर्णयाबाबत आजही मनात सल आहे, कोणते निर्णय अनुभवाच्या जोरावर योग्य ठरले आणि कोणते केवळ नशिबाच्या साथीनं योग्य ठरले. या सगळ्या मला पडलेल्या प्रश्नांना मी दिलेलं प्रामाणिक उत्तर म्हणजे ‘चूजिंग गोल्ड’ हे पुस्तक. त्यात कोणताही आडपडदा नाही किंवा यशानंतर निर्माण होणाऱ्या परिपूर्णतेचा कोणता आवही नाही.”

या पुस्तकाचा औपचारिक प्रकाशन सोहळा ६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे खासगी समारंभात पार पडणार पडला, त्यावेळी डॉ. सौरभ गाडगीळ यांच्यासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षित विशेष संवाद साधला. या संवादातून ‘चूजिंग गोल्ड’ या पुस्तकामागील प्रेरणादायी प्रवास, अनुभव आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीवर प्रकाश टाकला गेला. ‘चूजिंग गोल्ड’ हे पुस्तक भारतातील सर्व ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या शोरूममध्ये तसेच पीएनजीज्वेलर्स डॉट कॉम वर उपलब्ध असून, ऍमेझॉन वर प्री-ऑर्डरसाठी खुले आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पासून हे पुस्तक देशभरातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल. तसेच, याची किंडले आवृत्ती देखील लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें