म्हापसा येथील आंदोलनात ‘उमर खालीद याला मुक्त करा’चे फलक

म्हापसा येथील आंदोलनात ‘उमर खालीद याला मुक्त करा’चे फलक
आतंकवाद्यांचे समर्थक करणार्‍यांवर कारवाई करा  ! – हिंदु जनजागृती समिती
पणजी, २५ जुलै –  राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परिक्षेतील (‘नीट’ परिक्षेतील) प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणी म्हापसा येथील लोहिया उद्यानात २५ जुलै या दिवशी सायंकाळी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. संविधानाने प्रत्येकाला आपली मागणी मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि याच धर्तीवर ही शांततापूर्ण निदर्शने झाली; मात्र यामध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या देहली दंगलीचा कट रचणे, तसेच हिंसाचार भडकवणे यांप्रकरणी ‘युएपीए’च्या अंतर्गत अटक करण्यात आलेल्या आणि सध्या कारागृहात असलेल्या उमर खालीद याच्या समर्थनार्थ फलक घेतलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘उमर खालीद याला मुक्त करा’अशा आशयाचा फलक घेतलेले विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते, तसेच  देहली येथे ‘जवाहरलाल नेहरू विद्यापिठा’त दिल्या जाणार्‍या ‘हमे चाहीए आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. ‘नीट’ पेपरफुटीसंबंधी आंदोलनाशी ‘उमर खालीद याला मुक्त करा’याच्याशी कोणता संबंधी आहे? या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आंदोलन भरकटवणारे आणि देशद्रोह्यांना पाठिंबा देणारे यांच्यावर प्रशासन आणि पोलीस यांनी कारवाई करावी, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी आहे
आपला विश्वासू,
डॉ. मनोज सोलंकी,राज्य समन्वयक, गोवा,
हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क क्रमांक – ९३२६१०३२७८)

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें