छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य

छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार! – मुख्यमंत्री विष्णूदेव साय

सोमनाथ शिवलिंगाच्या दिव्यांशांच्या दर्शनासाठीही मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आश्‍वासन!

रायपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील विविध तीर्थक्षेत्रेपवित्र नद्या आणि पौराणिक स्थळे येथील आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे अन् वास्तूंचे भावी पिढ्यांसाठी जतन होण्याच्या दृष्टीने राज्य सरकार सनातन संस्थेला सर्वतोपरी साहाय्य करेलअसे महत्त्वपूर्ण आश्वासन छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्रीविष्णूदेव साय यांनी दिले.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारीणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नुकतीच छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्रीविष्णूदेव साय यांची भेट घेतलीया भेटीदरम्यान सांस्कृतिक वारशांच्या जतनाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आलीत्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.

सोमनाथ शिवलिंगाच्या दिव्यांशांचे भाविकांना दर्शन घडवणार

एक सहस्र वर्षांपूर्वी गझनीच्या महमूदाने ऐतिहासिक सोरटी सोमनाथ शिवलिंगाचा विध्वंस केला होतामात्र सुदैवाने या शिवलिंगाचे दिव्यांश आजही सुरक्षित आहेतविशिष्ट चुंबकीय तत्त्व असलेल्या या सोमनाथ शिवलिंगाच्या दिव्यांशांचे छत्तीसगडमधील भाविकांनाही दर्शन घेता यावेयासाठी केंद्र सरकारच्या ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ या अभियानांतर्गत राज्यात विशेष आयोजन करण्याच्या संदर्भातही मुख्यमंत्री श्रीविष्णूदेव साय यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासनाकडून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

सनातनच्या कार्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

या विशेष भेटीदरम्यान माननीय मुख्यमंत्र्यांनी सनातन संस्थेचे देशभरात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म हिताचे कार्यतसेच गोवा येथील सनातनच्या आश्रमात चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाच्या विविध उपक्रमांची अत्यंत आस्थेने माहिती जाणून घेतलीया महत्त्वपूर्ण प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्रीप्रबल प्रताप जूदेवहिंदु राष्ट्र समन्वय समितीचे अधिवक्ता आशिष शर्माहिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्रीसुनील घनवट आणि समितीचे छत्तीसगड येथील सर्वश्री कमल विश्वासआशिष परेडारोहितसिंग तिरंगाहेमंत कानसकर आणि नीरज क्षीरसागर उपस्थित होते.

आपला नम्र,

श्रीचेतन राजहंस,
राष्ट्रीय प्रवक्तेसनातन संस्था,
(संपर्क ७७७५८ ५८३८७)


———————
छायाचित्र ओळ :

1. सनातन संस्थेच्या वतीने श्रीकृष्णार्जुनाची मोठी प्रतिमा भेट देतांना डावीकडून श्री. चेतन राजहंस, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, तर प्रतिमा स्वीकारतांना छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री श्री विष्णूदेव साय आणि भाजपचे छत्तीसगड उपाध्यक्ष श्री. प्रबल प्रताप जुदेव !

2. छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री श्री विष्णूदेव साय यांच्या हस्ते भेटवस्तू स्वीकारतांना डावीकडून सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारीणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ व श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

3. छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री श्री विष्णूदेव साय यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात सहभागी असलेले संत व अन्य मान्यवर व्यक्ती तथा हिंदुत्वनिष्ठ !

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें