जंतर-मंतरवर ‘हिंदू देवतांचा अवमान आणि ‘हेट स्पीच’ कुणाल कामरा व प्रकाश राज यांच्यावर गुन्हा दाखल करा !

जंतरमंतरवर ‘हिंदू देवतांचा अवमान आणि ‘हेट स्पीच’

कुणाल कामरा व प्रकाश राज यांच्यावर गुन्हा दाखल करा !
– हिंदु जनजागृती समिती व सर्वोच्च न्यायालयातील वकीलांची मागणी

नवी दिल्ली जंतरमंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली नीट (NEET) परीक्षेच्या प्रश्नावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उघडपणे हिंदु धर्माचा अपमान आणि देशविरोधी चिथावणी दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहेयाविरोधात आज सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि ‘हिंदु जनजागृती समिती’च्या संयुक्त शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

संसद मार्ग पोलीस ठाण्याचे एसएचओ यांना प्रत्यक्ष भेटून हे निवेदन देण्यात आलेया शिष्टमंडळात सर्वोच्च न्यायालयाचे अधिमकरंद अडकरअधिअमिता सचदेवाअधिअतुल शर्माअधिमयंक द्विवेदीअधिकेशरी सत्याअधिपार्थ यादवअधियादवेंद्र सक्सेना यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे दिल्ली राज्य समन्वयक श्रीकार्तिक साळुंखे आणि श्रीश्रीराम लुकतुके यांचा समावेश होता.

तक्रारीत म्हटले आहे कीस्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मंचावरून ‘‘हे सरकार अनेक वर्षांपासून सीताच्या पतीचे (रामाचेनाव घेऊन नीताच्या पतीचे (मुकेश अंबानीचेकाम करत आहे,’’ असे अत्यंत अपमानास्पद विधान करून १०० कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेतआंदोलनाच्या मंचावरून एका महिलेने ‘‘सब बुत उठवाए जाएंगे… बस नाम रहेगा अल्लाह का’’ (सर्व मूर्ती हटवल्या जातील आणि केवळ अल्लाहचे नाव राहीलहे पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांचे भडकावू गाणे गायलेहा थेट मूर्तीपूजक हिंदु धर्मावरील हल्ला आहेया मंचावर ‘सिमी’ (SIMI) या भारत सरकारने बंदी घातलेल्या कट्टरपंथी संघटनेशी संबंधित असलेले आणि दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदचे वडील सय्यद कासिम रसूल इलियास हे देखील उपस्थित होतेतसेच अभिनेता प्रकाश राज यांनी मंचावरून ‘आम्हाला दहशतवादी किंवा पाकिस्तानी म्हटले तरी पर्वा नाही,’ असे म्हणत तरुणांना व्यवस्थेविरोधात विद्रोह व बंड करण्यासाठी भडकावले.

हे विद्यार्थ्यांचे आंदोलन नसून देशविरोधी आणि वामपंथी विचारांच्या लोकांचा हा एक राजकीय अजेंडा आहेहे यावरून स्पष्ट होतेया निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी दिलेल्या ऐतिहासिक निकालाचा (शाहीन अब्दुल्ला विरुद्ध भारत संघसंदर्भ देण्यात आला असून त्यानुसार पोलिसांनी स्वतःहून तत्काळ कारवाई करावीअशी आग्रही मागणी करण्यात आली आहेतसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९ (धार्मिक भावना दुखावणे), १९६ (शत्रुत्व पसरवणे), १५२ (देशाच्या अखंडतेला धोकाआणि ३५३ (भडकावू विधानेअंतर्गत तत्काळ गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी केली आहेतसेच या आंदोलनाच्या फंडिंगची आणि ‘सिमी’शी संबंधित लोकांच्या सहभागाची बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक (UAPA) कायद्यांतर्गत सखोल चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री आणि दिल्ली पोलीस आयुक्तांकडेही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

आपला नम्र,

श्रीरमेश शिंदे,

राष्ट्रीय प्रवक्तेहिंदु जनजागृती समिती,

(संपर्क क्र.: ९९८७९ ६६६६६)

—————
छायाचित्र ओळ :

1. दिल्ली येथील संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देतांना सर्वोच्च न्यायालयाचे अधि. मकरंद अडकर, अधि. अमिता सचदेवा, अधि. अतुल शर्मा, अधि. मयंक द्विवेदी, अधि. केशरी सत्या, अधि. पार्थ यादव, अधि. यादवेंद्र सक्सेना यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे दिल्ली राज्य समन्वयक श्री. कार्तिक साळुंखे आणि श्री. श्रीराम लुकतुके

2. पोलीस तक्रार, Police complaint,

3. जंतर-मंतरवर ‘हिंदू देवतांचा अवमान आणि ‘हेट स्पीच’

4. स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने यांचे आक्षेपार्ह वक्तव्य : ‘‘ हे सरकार अनेक वर्षांपासून सीताच्या पतीचे (रामाचे) नाव घेऊन नीताच्या पतीचे (मुकेश अंबानीचे) काम करत आहे ,’’

5. वक्ता :  जंतर-मंतर पर हिंदू देवताओं का अपमान और ‘हेट स्पीच’; कुणाल कामरा और प्रकाश राज पर एफआयआर दर्ज करे ! – हिन्दू जनजागृति समिति एवं सुप्रीम कोर्ट के वकीलों की मांग

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें