हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !*_

 

दिनांक : १५.०७.२०२६

_*हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !*_

*स्टुडंट्स इस्लामिक संघटना किंवा तत्सम बाह्य संस्था यांच्या कार्यक्रमाविषयी मागदर्शक तत्त्वे प्रसारित*

पणजी, १५ जुलै – गोवा सरकारच्या शिक्षण खात्याने शाळा व महाविद्यालये यांमध्ये ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ (एस्.आय.ओ.) किंवा तत्सम बाह्य संस्था यांच्या कार्यक्रमांबाबत कठोर मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. हिंदू राष्ट्र समन्वय समितीने नोव्हेंबर २०२५ मध्ये शिक्षण खात्याकडे सविस्तर निवेदन सादर करून ‘एस.आय.ओ.’ या संघटनेच्या विविध शैक्षणिक संस्थांमधील उपक्रमांविषयी गंभीर आक्षेप नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याने ‘एस.आय.ओ.’ किंवा तत्सम संस्थांच्या कार्यक्रमांविषयी कठोर मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहे. या प्रकरणी हिंदू राष्ट्र समन्वय समिती गोवा सरकार आणि शिक्षण खाते यांचे अभिनंदन करते.
हिंदू राष्ट्र समन्वय समितीने विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कट्टरवाद, राष्ट्रविरोधी किंवा समाजविघातक विचार रुजू नयेत, यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये अशा संघटनांना प्रवेश देण्यापूर्वी कठोर नियमावली असणे आवश्यक असल्याची मागणी केली होती. शिक्षण ही राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया असून विद्यार्थ्यांच्या मनावर कोणत्याही प्रकारच्या अतिरेकी किंवा विभाजनवादी विचारसरणीचा प्रभाव पडू नये, हे शासन आणि समाज यांचे सामूहिक दायित्व आहे.

आपले विश्वासू,
*श्री. सत्यविजय नाईक*
हिंदू राष्ट्र समन्वय समिती
(संपर्क क्रमांक : ९१५८९५४४५५)

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें