मंदिर-संस्कृती रक्षणासाठी मंदिर न्यास परिषद !*

_*गोमंतक मंदिर महासंघाचा लेख*_

दिनांक : २९.०५.२०२६

*मंदिर-संस्कृती रक्षणासाठी मंदिर न्यास परिषद !*

*गोमंतक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी रविवार, रविवार, ३१ मे २०२६ या दिवशी सिंहपुरुष सभागृह, श्री महालसा मंदिर, म्हार्दाेळ येथे राज्यस्तरीय मंदिर परिषदेचे आयोजन केले आहे.या निमित्ताने हा लेख प्रपंच.*

*प्रस्तावना :* प्राचीन काळापासून हिंदूंच्या जीवनात मनःशांती, आध्यात्मिक बळ, समाजसंघटन, धर्मशिक्षण, धर्मसंस्कार, विविध कलांचे शिक्षण, धर्मप्रचार, बलोपासना प्रदान करणारी केंद्रे म्हणून मंदिरांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. याच कारणाने एक हजार वर्षे इस्लामी, ख्रिस्ती आणि पोर्तुगिज यांची आक्रमणे होऊनही हिंदूंचे अस्तित्त्व टिकून राहिले; मात्र सध्याच्या ‘सेक्युलर’ व्यवस्थेत मंदिर संस्कृती विकसित होण्यापेक्षा तिचे अधःपतन होत आहे. सरकारी हस्तक्षेपाद्वारे मंदिरांच्या शेकडो वर्षांच्या परंपरा नष्ट होत आहेत. या समस्यांवर उपाय शोधून मंदिरांच्या माध्यमांतून राष्ट्र-धर्म कार्य करण्यासाठीच ‘मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली आहे. आज गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे १७ सहस्रांहून अधिक मंदिर विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी तेथील मंदिर महासंघाशी जोडले गेले आहेत.

मंदिरांसमोरील समस्या : भारतातील हिंदूंची अनुमाने ४ लाखांहून अधिक प्रमुख मंदिरे सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. ‘सेक्युलर’ सरकारे या मंदिरांचा केवळ आर्थिक लूट करण्यासाठी वापर करत आहेत. तसेच मंदिरांचे सरकारीकरण करणार्‍या ‘सेक्युलर’ सरकारने मशीद किंवा चर्च यांचे सरकारीकरण का नाही केले ?, असा प्रश्न आहे. सध्या मंदिराच्या व्यवस्थापनासमोर मंदिरातील नित्याची पूजा-अर्चा करणे, वार्षिक उत्सव, दैनंदिन खर्च भागवणे, सोयी-सुविधा, मंदिराचा जीर्णोद्धार करणे यांसारख्या अनेक समस्या आहेत. यावर उपाय शोधण्यासाठी मंदिर महासंघाचे प्रयोजन आहे. तसेच विशेष म्हणजे पोर्तुगिजांनी गोव्यात सहस्त्रो मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत आणि अशा अनेक मंदिरांची भूमी हिंदूंना परत मिळालेली नाही.

*मंदिर महासंघाने अल्पावधीत केलेले कार्य ! :* मंदिरांमधून धर्मशिक्षणाची व्यवस्था होण्यासाठी प्रयत्न करणे, सरकारी नियंत्रणातील मंदिरांमधील भ्रष्टाचारविरोधात लढा देणे, मंदिरांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधणे, मंदिरातील पवित्रता राखण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथील सहस्त्रो मंदिरांमध्ये वस्त्र-संहिता लागू करणे असे कार्य महासंघाने अल्पावधीत केले आहे. मंदिरांतून भाविकांना, युवकांना हिंदु धर्माचे शिक्षण मिळावे; म्हणून धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन लावण्यास प्रारंभ करण्यात आला. काही ठिकाणी धर्मग्रंथांचे निःशुल्क वाचनालय चालू करण्यात आले.

*म्हार्दाेळ येथील राज्यव्यापी मंदीर परिषदेत चर्चिली जाणारी महत्त्वाची सूत्रे* – गोमांतक मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरांच्या विश्वस्तांचे संघटन बळकट करणे, मंदिरांशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा आणि उपाययोजनात्मक चिंतन करणे, मंदिर समित्यांनी मंदिरांचे व्यवस्थापन आदर्श असे करण्यासाठी केलेले प्रयत्नांचे आदान प्रदान करणे, राज्यातील पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी याविषयी विचार विनमय करून योग्य दिशादर्शन करणे, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम विषयी जागृती करणे, मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू केल्याने होणारे लाभ, मंदिर परिसर मद्य मुक्त करणे आणि जत्रोत्सवात लागणारे मांस विक्री स्टॉल बंद करणे, मंदिर-जत्रा उत्सव अशा ठिकाणी हिंदू सोडून अन्य धर्मियांना स्टॉल उभारण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये आदी विषयांवर चर्चा करून धोरण निश्चित केले जाणार आहे.

आपले विश्वासू,
*श्री. जयेश थळी,*
गोमंतक मंदिर महासंघ
(संपर्क क्रमांक : ९५२७७ ६००६१)

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें