कॉर्पोरेट जिहाद’ व ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ अभियानास प्रारंभ! कॉर्पोरेट जिहादचा मुद्दा संसदेत मांडून कंपन्यांसाठी नियम-अटी करणार!

कॉर्पोरेट जिहाद’ व लव्ह जिहादच्या विरोधातील बेटी सुरक्षितराष्ट्र सुरक्षित’ अभियानास प्रारंभ!

कॉर्पोरेट जिहादचा मुद्दा संसदेत मांडून कंपन्यांसाठी नियम-अटी करणार!
– 
राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

पुणे – केवळ ‘कॉर्पोरेट जिहाद’च नव्हे, तर जिथे संधी मिळेल, तिथे भारताचे अस्तित्व पोखरण्याचे आणि देशाचे लचके तोडण्याचे कारस्थान पद्धतशीर चालू आहे. आज ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या माध्यमातून आपल्या तरुण पिढीच्या विचारसरणीवर आणि धर्मावर जे पद्धतशीर आक्रमण होत आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे. यात केवळ प्रत्यक्ष गुन्हेगारांनाच नव्हे, तर त्यांना छुप्या पद्धतीने रसद पुरवणाऱ्या संपूर्ण यंत्रणेला आणि व्यवस्थेला कायद्याच्या चौकटीत आणून कठोर शासन करणे आवश्यक आहे. त्यासाठी हा ‘कॉर्पोरेट जिहाद’चा मुद्दा मी आगामी काळात संसदेत मांडणार आहे. कार्पोरेट आस्थापनांमधील वाढता जिहाद रोखण्यासाठी ही आस्थापने भारतात येण्यापूर्वीच त्यांच्यावर काही बंधने, नियम अटी लागू करू शकतो का यादृष्टीने विचार चालू आहे, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपच्या राज्यसभेतील खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या अभियानाचा प्रारंभ पुण्यातून करण्यात आला. त्या प्रसंगी आयोजित ‘कॉरर्पोरेट जिहाद’ नक्की सत्य काय ?’ या ‘विशेष संवादा’त त्या बोलत होत्या.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑडिटोरियममध्ये आयोजित या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांसह कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुण-तरुणींनी आणि पुणेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि प्रसिद्ध लेखिका सौ. शेफाली वैद्य यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

लेन्सकार्ट’ व टीसीएससारख्या कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवावा !
– शेफाली वैद्य

या वेळी बोलतांना सौ. शेफाली वैद्य म्हणाल्या की, केवळ नाशिकमधील टीसीएस ही बहुराष्ट्रीय कंपनीच नव्हे, तर पब्लिक लिमिटेड कंपनी असलेल्या ‘लेन्सकार्ट’मध्ये ‘हिजाब, पगडी चालेल; मात्र कुंकू, टीळा, कलावा चालणार नाही’, असे उघडपणे हिंदूंशी भेदभाव करणारे संविधानविरोधी नियम बनवले गेले होते. तीव्र विरोध झाल्यावर हे नियम केवळ आठ दिवसांसाठीच शिथील केले होते; हा पण कॉर्पोरेट जिहादच आहे. मुसलमान वा अन्य धर्मीयांबाबतच्या प्रथा परंपरा चालतील; मात्र हिंदू धर्मातील प्रथा-परंपरा चालणार नाही हे शाळेपासूनची मानसिकता घेऊन हिंदू मोठा होतो. पुढे कॉर्पोरेट कल्चरमध्ये गेल्यावर बहुसंख्येने असूनसुद्धा हिंदू मुकाट्याने सर्व अन्यायकारक बंधने स्वीकारतो. भेदभाव सहन करतो. त्याची पुढची पायरी म्हणजे त्याला नाशिकमधील टीसीएस् कंपनीप्रमाणे अन्य धर्मीयांचे अत्याचार सहन करण्याची पाळी येते. अन्य धर्मीय ज्याप्रमाणे त्यांच्या प्रथा-परंपरा पाळण्यासाठी जागृत असतात. तसे हिंदूंनी स्वत:च्या धार्मिक अस्मितेसाठी कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात जागृत होऊन संघटितपणे आवाज उठवला पाहिजे. तसे झाले, तर हिंदू समाज व हिंदू संघटना त्यांच्या मागे उभ्या राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिहादचा सामना करण्यासाठी हिंदूंमध्ये स्वबोध’ व शत्रुबोध’ होणे आवश्यक – श्री. रमेश शिंदे

आज समाजामध्ये घडणाऱ्या गंभीर घटना पाहता नराधमांना फाशीपेक्षाही कडक शासन करण्याची वेळ आली आहे; वर्ष ७११ मध्ये मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून सुरू झालेले हे जिहादचे षड्यंत्र ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ अशा विविध रूपांत आजही सुरू असून, ‘गजवा-ए-हिंद’ आणि ‘व्हिजन २०४७’ च्या माध्यमातून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे लिखित मनसुबे रचले जात आहेत. काश्मीरमधील हिंदूंचा नरसंहार, अजमेर सेक्स स्कँडल आणि केरळमधील मुख्यमंत्र्यांनी उघड केलेला ‘रोमिओ जिहाद’ यांसारख्या घटनांमागे मुसलमानांची लोकसंख्या वाढवणे, हिंदू डीएनए संपवणे आणि विकृत मानसिकता जोपासणे ही मुख्य कारणे असून या संकटाचा सामना करण्यासाठी हिंदूंमध्ये ‘स्वबोध’ आणि ‘शत्रुबोध’ होणे आवश्यक आहे. पालकांनी पाल्यांशी संवाद वाढवून त्यांना हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व समजावणे आणि प्रत्येक मुलीच्या रक्षणाकरिता सर्वांनी एकजुटीने जनजागृतीचे अभियान राबवणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या प्रसंगी केले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या लव्ह जिहाद आणि राष्ट्र-धर्मावरील ग्रंथ कक्षाला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात शंखनादाने आणि मान्यवरांच्या सत्काराने झाली, तर शेवटच्या सत्रात उपस्थितांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आली. या राष्ट्रव्यापी अभियानाच्या प्रारंभामुळे हिंदू समाजात एक नवा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचे YouTube.com/@hindujagruti वरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

आपला नम्र,

श्री. रमेश शिंदे,

राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

(संपर्क क्र. : ९९८७९ ६६६६६)

——————————————————————

Photo Captions:

Corporate Jihad : ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या अभियानाचा लोगो हातात धरून अभियानाचा प्रारंभ करतांना डावीकडून खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, लेखिका सौ. शेफाली वैद्य व समितीचे श्री. रमेश शिंदे !

Dr Medha Kulkarni : प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, राज्यसभा खासदार, भाजप

Mrs Shefali Vaidya : सौ. शेफाली वैद्य, प्रसिद्ध लेखिका
Ramesh Shinde_HJS : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

Upasthiti_Pune : कार्यक्रमला उपस्थित कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुण-तरुणी आणि पुणे येथील नागरिक

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें