सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांना “धर्म अलंकार पुरस्कार” आणि “माँ पटन देवी सन्मान” ने सन्मानित आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सनातन धर्म; राम मंदिर आणि संगम

सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांना धर्म अलंकार पुरस्कार” आणि माँ पटन देवी सन्मान” ने सन्मानित

आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सनातन धर्मराम मंदिर आणि संगम
स्नानामुळे वाढते सकारात्मक ऊर्जा! 
– सद्गुरु नीलेश सिंगबाळ

     पटना (बिहार) : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनाने आधुनिक वैज्ञानिक मापदंडांवर सिद्ध केले आहे की, आध्यात्मिक साधना आणि वास्तुशास्त्राचा थेट परिणाम मानवी ऊर्जा आणि पर्यावरणावर पडतो. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी वैज्ञानिक संशोधनाच्या माध्यमातून सांगितले की, अयोध्या श्री राममंदिर निर्माणामुळे तेथील भूमीच्या सकारात्मक ऊर्जेत १६ पटीने वाढ झाली आहे, तर त्रिवेणी संगमात पवित्र स्नानामुळे भाविकांच्या आभामंडळात १३३% पर्यंत वाढ झाली आहे. आधुनिक स्कॅनरद्वारे प्रमाणित या निष्कर्षांना नुकतेच COP29 (बाकू) आणि दावोस (WEF 2026) सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवरही प्रमुखतेने सादर करण्यात आले आहे. ते पाटणा, बिहार येथे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तु आणि तंत्र संमेलनात’ ‘‘भारताच्या भूमीची आध्यात्मिक पवित्रता त्याच्या आध्यात्मिक आणि सांसारिक प्रगतीचे प्रमाण कशी होती’’ या विषयावर सादरीकरण करत होते.

     या संमेलनाचे आयोजन विश्व ज्योतिष महासंघाचे अध्यक्ष आणि विश्व ज्योतिष-संघाचे अध्यक्ष आचार्य (डॉ.) अशोक मिश्रा यांनी दक्षिण आशियाई ज्योतिष-संघ आणि ज्योतिष, वास्तु व वैदिक विज्ञान केंद्राच्या सहयोगाने केले होते. यामध्ये विविध विषयांच्या आणि देशांच्या अनेक प्रतिनिधींनी भाग घेतला, ज्यामध्ये मुख्य अतिथी श्री. अशोक चौधरी (ग्रामीण कार्य विभाग मंत्री, बिहार), राजगुरु श्री. माधव भट्टाराय (नेपाल), आणि श्री. अनुप कुमार (कला आणि संस्कृती राजदूत, पश्चिम बंगाल) विशेष रूपाने उल्लेखनीय राहिले.

     सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी पुढे म्हणाले की , व्यक्तींच्या आध्यात्मिक साधनेचा त्यांच्या वास्तू आणि पर्यावरणावरही सकारात्मक प्रभाव पडतो. एका प्रयोगात, ज्या घरातील रहिवासी साधना (आध्यात्मिक अभ्यास) करत होते, तिथल्या नळाच्या पाण्याच्या नमुन्यात उच्च सकारात्मक आभामंडळ दिसून आले. याउलट, साधना न करणाऱ्या शेजाऱ्याच्या घरचे पाणी, एकच जलस्रोत असूनही, नकारात्मक स्पंदने (negative vibrations) दर्शवत होते. MAV च्या आध्यात्मिक शोध पथकाद्वारे आधुनिक आभामंडल आणि ऊर्जा स्कॅनरचा उपयोग करून केलेले असे अनेक अभ्यास त्यांनी सामायिक केले.

     सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी उद्धृत केले की, ‘‘भारत एक राष्ट्र म्हणून उदय पावेल आणि ‘विश्वगुरू’ म्हणून आपले उचित स्थान ग्रहण करेल, जिथे सनातन धर्म केंद्रस्थानी असेल; ही भविष्यवाणी वर्ष १९९८ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांच्याद्वारे केली गेली होती. आता ती वर्ष २०२५ पासून सत्यात साकार होताना दिसत आहे.’’ या संमेलनामध्ये सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत बाळाजी आठवले यांना धर्म आणि आध्यात्मिकता क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी ‘‘धर्म अलंकार पुरस्कार’’ आणि “माँ पटन देवी सन्मान” ने सन्मानित करण्यात आले. या सन्मानाचा स्वीकार सद्गुरु निलेश सिंगबाळ यांनी केला.

आपली नम्र,

सौ. श्वेता क्लार्क,

संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय,

(संपर्क: ९५६१५७४९७२)

——————————————————————————

Photo Caption : 

Sadguru Nilesh Singbal_Margdarshan

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें