हळदोणा वाताहार पेडणे येथे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचा भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न*
हळदोणा वाताहार
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने पेडणे भगवती हायस्कूल येथे दिमाखात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची जाणीव निर्माण व्हावी तसेच नैतिक मूल्यांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी रामायण, महाभारत, संतचरित्रे आणि क्रांतिकारकांच्या कथांवर आधारित लेखी परीक्षा घेतली जाते.

यंदा या परीक्षेसाठी तब्बल ५८ शाळांमधील ३०००विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ३०० विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून १२२ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. उर्वरित यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमास शिक्षण अधिकारी श्री. मनोज सवाईकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय कोरगावकर, प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. गोपाळ गुरव गुरुजी, गोवा विभाग अध्यक्ष श्री. संतोष नाईक, सह संयोजक श्री. गौरव कुलकर्णी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोदभाई सांगोडकर, संयोजक श्री. भारत बेतकीकर, उत्तर गोवा समन्वयक सौ. कुसुमताई साळकर, मातृशक्ती संयोजिका सौ. क्रांतीताई शेट्ये व सौ. संध्याताई परब यांच्यासह अनेक शिक्षक, पालक आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सुमारे ३०० उपस्थितांच्या साक्षीने हा सोहळा उत्साहात पार पडला. शेवटी सर्व पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
फोटो भारत बेतकेकर
संकृती प्रतिष्टान संवधन चा बक्षिस वितरण समारंभात उपस्थित मनोज सावईकर डा. संजय कोरगावकर गौरव कुलकर्णी, संतोष नाईक, गोपाळ गुरव






