_
दिनांक : ४.३.२०२६
_*हिंदु जनजागृती समितीने तक्रार नोंदवल्याचे प्रकरण*_
*अल्पवयीनांचा सहभाग असलेली ‘हयात सेंट्रीक होळी बॅश’ या पार्टी रहित : कळंगुट पोलिसांनी दिली माहिती*
पणजी, ४ मार्च – कांदोळी येथील ‘हायत सेंट्रिक’ पंचतारांकित हॉटेलमध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर ४ मार्च या दिवशी होणार असलेली आणि अल्पवयीनांना सहभागी असलेली ‘हयात सेंट्रीक होळी बॅश’ ही पार्टी रहित करण्यात आल्याची माहिती कळंगुट पोलीस ठाण्याचे निरीक्षक लक्शी आमोणकर यांनी हिंदु जनजागृती समितीला दिली आहे. हिंदु जनजागृती समितीने याविरोधात उत्तर गोव्याचे जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.
हिंदु जनजागृती समितीने तक्रारीत म्हटले होते की, ‘हयात सेंट्रीक होळी बॅश’ या पार्टीमध्ये बिअरचा अमर्यादित पुरवठा केला जाणार असल्याचे, तसेच निरनिराळे मद्यही पुरवले जाणार असल्याचे आयोजकांनी म्हटले होते. या पार्टीमध्ये ८ वर्षांवरील मुलांना सहभागी होता येणार होते. हिंदु जनजागृती समितीने याविषयी महिला आणि बालकल्याण विभागाकडेही तक्रार नोंदवली होती. समितीने केलेल्या तक्रारीची नोंद घेऊन उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने उत्तर गोवा समुद्रकिनारपट्टीत ‘होळी पार्टी’चे आयोजन करणार्यांकडे सुरक्षेसंबंधीu आवश्यक अनुमती आहेत का? याची पडताळणी करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले होते. पोलीस प्रशासनाने तक्रारीची नोंद घेतल्यानंतर अल्पवयीनांचा सहभाग असलेली ‘हयात सेंट्रीक होळी बॅश’ या पार्टी रहित झालेली आहे. दुष्प्रवृत्ती आणि अमंगल विचारांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा संदेश देणारा होळी उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रकार गोव्यातील काही नाईट क्लब्स, पंचताराकित हॉटेल, रिव्हर क्रूझ आदींकडून केला जात आहे. अशा प्रकारच्या पार्ट्यांना शासन आणि पोलीस यांनी यापुढे अनुमती देऊ नये, तसेच अशा पार्ट्यांचे आयोजन करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
आपले विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,*
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)






