भगवान शिव आणि श्री गणेशाचा अवमान करणारी जाहिरात कंपनीने घेतली मागे; केली लेखी क्षमायाचना!*

 

दिनांक : १५.०२.२०२६

*हिंदु जनजागृती समितीच्या लढ्याला यश !*

*भगवान शिव आणि श्री गणेशाचा अवमान करणारी जाहिरात कंपनीने घेतली मागे; केली लेखी क्षमायाचना!*

महाशिवरात्रीचे भक्तीमय वातावरणात असतांना ‘श्री गणेश ग्लोबल गुलाल प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने छत्तीसगडमधील ‘दैनिक भास्कर’ आणि ‘हरिभूमी’ या वृत्तपत्रांत श्री गणेश आणि भगवान शिव यांचा वापर व्यावसायिक जाहिरातीसाठी करून देवतांचे विडंबन केले होते. या अपमानजनक जाहिरातीविरोधात समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि छत्तीसगड येथील समितीचे श्री. कमल बिस्वाल यांनी पोलीस कारवाईची मागणी केली होती. संबंधित कंपनीशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. समितीच्या तीव्र विरोधामुळे कंपनीने अखेर आपली चूक मान्य केली. कंपनीने आता लेखी स्वरूपात बिनशर्त माफी मागितली असून जाहिरातही मागे घेतली आहे. देवतांचा अनादर थांबवून त्यांची पवित्रता राखण्यात समितीला हे यश मिळाले आहे.

*आक्षेपार्ह जाहिरात* : या जाहिरातीत व्यावसायिक फायद्यासाठी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानजनक चित्रण करण्यात आले होते. जाहिरातीत पूज्य श्री गणेशाच्या हातांत ‘गुलाल’ आणि ‘थंडाई’ची पाकिटे दाखवण्यात आली होती, जे देवतांना ‘मॉडेल’ म्हणून सादर करण्यासारखे आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने देवतांना ‘सेल्समन’ (विक्रेता) प्रमाणे दाखवून त्यांच्या दिव्य स्वरूपाचे व्यापारीकरण करण्यात आले होते. याशिवाय भगवान शिव आणि शिवलिंगाच्या अवतीभवती ‘कॅप्टन अमेरिका’सारखी परदेशी काल्पनिक पात्रे आणि इतर उत्पादने दाखवणे, हा हिंदू श्रद्धेचा घोर अपमान आणि उपहास होता.

*कंपनीने मान्य केली चूक!* : तीव्र विरोध झाल्यानंतर कंपनीचे संचालक उमंग गोयल यांनी मान्य केले की, भगवान श्री गणेशाच्या हातांत स्वतःचे ‘प्रोडक्ट’ दाखवणे ही त्यांची एक “मोठी चूक आणि अनावधानाने झालेली गंभीर चूक” होती. ही दुर्दैवी घटना चुकीमुळे घडली असून समस्त हिंदू सनातनी समाजाची आम्ही अंतःकरणपूर्वक माफी मागतो, असे कंपनीने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच भविष्यात अशी चूक पुन्हा कधीही करणार नाही, असे आश्वासनही कंपनीने दिले आहे.

*समितीची भूमिका स्पष्ट करतांना म्हटले आहे की,* हिंदू देवतांचा जाहिरातींसाठी वापर करणे, हा त्यांच्या पवित्रतेचा आणि दिव्यत्वाचा अनादर आहे. ज्याप्रमाणे इतर धर्मांच्या श्रद्धास्थानांबाबत संवेदनशीलता दाखवून त्यांच्या धार्मिक भावना जपल्या जातात. तशीच गंभीरता हिंदूंच्या श्रद्धेबाबतही असायला हवी. कोणत्याही कंपनीला आपल्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी हिंदूंच्या देवतांचा अपमान करण्याचा अधिकार नाही. ‘कला’ अथवा ‘सर्जनशीलता’च्या नावाखाली धार्मिक भावनांशी दुखावणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर लढा आणि जनजागृती सातत्याने सुरू राहील, असा इशारा समितीने दिला आहे.

आपला विश्वासू,

*श्री. सुनील घनवट,*
राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,
हिंदु जनजागृती समिती (संपर्क: ७०२०३ ८३२६४)

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें