स्वयंरोजगारातून राष्ट्रउभारणीचा मार्ग – विनय कोल्हे
हरमल पेडणे येथे राष्ट्रीय युवा कबड्डीपटू भार्गव मांद्रेकर यांच्या मैत्रेय प्रिंटिंग स्टुडिओचे उदघाटन.
हरमल दि
स्वयंरोजगार हा केवळ स्वतःच्या प्रगतीचा नव्हे तर राष्ट्राच्या उन्नतीचा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन विनय कोल्हे, व्यवस्थापक, युनियन बँक ऑफ इंडिया, केरी यांनी केले.

हरमल पेडणे येथे राष्ट्रीय युवा कबड्डीपटू व राष्ट्रीय युवा कबड्डी लीगचा स्टार भार्गव मांद्रेकर यांच्या मैत्रेय प्रिंटिंग स्टुडिओचे उदघाटन केल्यानंतर कोल्हे बोलत होते.
याप्रसंगी भार्गव मांद्रेकर, दिगंबर गुरव, गुरु कोरखणकर, अमोल आसोलकर, कृष्णा भाटलेकर, विलास कोरखणकर, महेश मांद्रेकर, अर्जुन पवार, नंदलाल विश्वकर्मा, राकेश यादव, वेदान्त आजगावकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कोल्हे पुढे म्हणाले कि,
गोवा राज्य झपाट्याने प्रगती करत असून राज्याच्या बदलत्या गरजा ओळखून गोमंतकीय तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय उभारण्याकडे वळावे.
आज गोव्यात अनेक व्यवसाय परप्रांतीयांनी व्यापले असून, या पार्श्वभूमीवर स्थानिक तरुणांनी विविध व्यवसायांच्या संधींचा अभ्यास करून धाडसाने उद्योजकतेत प्रवेश करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत तरुणांनी नवे उद्योग, स्टार्टअप्स आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून ‘नवा भारत’ घडवण्याच्या क्रांतीत सहभागी व्हावे, असे प्रेरणादायी आवाहन श्री. कोल्हे यांनी आपल्या भाषणातून केले.
फोटो
हरमल पेडणे येथे मैत्रेय प्रिंटिंग स्टुडिओचे उदघाटन केल्यानांतर विनय कोल्हे, व इतर.






