भाटले, पणजी येथे १० जानेवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
पणजी, २६ डिसेंबर – हिंदूंना संघटित करून धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’साठी कृतीप्रवण करण्याच्या हेतूने हिंदु जनजागृती समितीने शनिवार, १० जानेवारी २०२६ या दिवशी श्री सटी भवानी मंदिर, भाटले, पणजी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन केले आहे. श्री सटी भवानी मंदिर, भाटले, पणजी येथे नुकत्याच आयोजित केलेल्या एका बैठकीत उपस्थितीत ३५ हिंदुत्वनिष्ठांनी ही सभा यशस्वी करण्याचा निर्धार केला.
या बैठकीला प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक यांनी हिंदूंच्या भेडसावणार्या आतंकवाद, घुसखोरी आदी समस्या आणि ही दु:स्थिती पालटण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले. पर्वरी येथे एका ६ वर्षाच्या मुलीवर अल्लाबक्ष सय्यदाबडे या धर्मांधाने लैंगिक अत्याचार केले ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि या धर्मांध वृत्तीच्या विरोधात आता आपण हिंदूंनी संघटित व्हायला हवे, असे यावेळी आवाहन करण्यात आले. या बैठकीत श्री सटी भवानी मंदिराचे अध्यक्ष सर्वश्री राजेश नाईक साखळकर, उपाध्यक्ष रामचंद्र प्रभू आजगावकर, तसेच विकास लवाते, रामदास सावईवेरेकर, नंदकुमार पाटिल, राजेश तिवारी, लक्ष्मिकांत तारी, सौ. शांता म्हांबरे आदींची उपस्थिती होती. बैठकीत उपस्थित हिंदूत्वनिष्ठांनी ‘हिंदूंनी आपल्या मुलांना धर्मशिक्षण द्यावे, अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण थांबवावे, हिंदूंनी संकुचित वृत्ती सोडून धर्मबंधूत्व अधिक दृढ करावे’ असे आवाहन केले. हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी होण्यासाठी समस्त हिंदूंनी हातभार लावण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. बैठकीचे सूत्रसंचालन श्री महेश प्रभू यांनी केले.
|
|
, पणजी येथे १० जानेवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा
Advertisement






