थिवि वाताहार
उत्तर शिक्षण क्षेत्रातील झोनल लेवल स्कूल कॉम्प्लेक्स समिती यांच्यावतीने शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील लोवर डिव्हिजन clerk साठी प्रशासकीय नियम सेवा व पेन्शन विषय या विषयावर कार्यशाळेचे आयोजन डी एम पी व्ही एस सरोजनी कुशे उच्च माध्यमिक विद्यालय आसगाव येथे घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात zLscc अध्यक्षा व शिक्षण उपसंचालक अंजली मळीक यांच्या स्वागत भाषणाने झाली त्यानंतर यजमान विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर केले.

कार्यशाळेसाठी प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून श्रीकृष्ण नाईक प्राचार्य शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय साखळी व वाळपई )े तसेच सायली आमोणकर माजी संयुक्त संचालक( लेखा) उपस्थित होत्या दोन्ही तज्ञ आणि सेवा व पेन्शन नियमावरील मुद्दे स्पष्टपणे मांडले, सहभागी एलडीसी कर्मचाऱ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले कार्यक्रमात सूत्रसंचालन रुल्डो डिसोजा यांनी केले संसाधन व्यक्तींची ओळख जुही थळी व अभिजीत पेडणेकर यांनी करून दिली आभार प्रदर्शन विठ्ठल पासैकर उपाध्यक्ष झेड एल एस सी सी यांनी केले कार्यक्रमास किरण शिरोडकर अध्यक्ष डी एम पी व्ही कुशे उच्च माध्यमिक विद्यालय जोशना सरीने उपशिक्षणाधिकारी ,उमाकांत साळकर सदस्य z एल एस सी सी आणि राजाराम नार्वेकर प्राचार्य उपस्थित होते
फोटो भारत बेतकेकर
आसगाव येथे प्रशासकीय नियम विषयक कार्यशाळा संपन्न






