डेव्हलपर्स समिट २.० – गोव्यातील उद्योजकतेच्या भविष्यास नवी दिशा*

*डेव्हलपर्स समिट २.० – गोव्यातील उद्योजकतेच्या भविष्यास नवी दिशा*

*मडगाव, ऑक्टोबर २०२५:* १३०० हून अधिक डेव्हलपर्स, विद्यार्थी, आयटी व्यावसायिक, तंत्रज्ञान उद्योजक आणि स्टार्टअप संस्थापकांना एकत्र आणणारा गोवा डेव्हलपर्स समिट 2.0 हा कार्यक्रम ११ ऑक्टोबर रोजी बीआयटीएस गोवा कॅम्पस येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

हा कार्यक्रम गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (जीसीसीआय) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, आणि माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभाग (डीआयटीईएन्डसी) यांनी त्याला पाठबळ दिले. तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या भविष्यास बळकटी देणारे व्यासपीठ म्हणून हा समिट ओळखला गेला. सकाळच्या सत्रात गोव्याचे माहिती तंत्रज्ञान, पर्यटन व छपाई आणि स्टेशनरी मंत्री श्री. रोहन खंवटे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व लाभले.

विद्यार्थी आणि युवा डेव्हलपर्सना उद्देशून बोलताना श्री. रोहन खंवटे म्हणाले, “गोव्याचे भवितव्य घडवण्यामध्ये तुमची भूमिका खूप महत्त्वाची आहे. नवकल्पना स्वीकारा आणि जगातील खऱ्या समस्या सोडवण्याचे ध्येय ठेवा. भविष्यातील तंत्रज्ञान तुमच्या हातात आहे, तुम्हीच ते निर्माते, समस्या सोडवणारे आणि बदल घडवणारे आहात. आमचे सरकार आणि संस्था तुमच्या स्वप्नांना आधार देण्यासाठी कटिबद्ध आहेत, जेणेकरून तुम्ही गोव्यासाठी नवीन व्यवसाय निर्माण करून पुढे घेऊन जाल. सरकार, उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्र येऊन उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्याला सज्ज असा डिजिटल गोवा घडवत आहेत.”

या समिटमुळे विद्यार्थ्यांना आणि तंत्रज्ञानप्रेमींना नवोपक्रमक, स्टार्टअप संस्थापक आणि उद्योगतज्ज्ञांशी संवाद साधण्याची, नवीन डेव्हलपमेंट साधने जाणून घेण्याची आणि उत्कृष्ट उद्योग अनुभव मिळवण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात २६ नामांकित वक्त्यांनी सहभाग घेतला, ज्यांनी तंत्रज्ञानातील नव्या प्रवाहांवर आपले विचार मांडले.

या कार्यक्रमातील वक्त्यांच्या यादीत अनेक नामांकित तंत्रज्ञान तज्ञांचा समावेश होता. त्यामध्ये अमेरिको (रिकी) नोरोन्हा (संस्थापक संचालक, ऑनलाईन प्रोडक्टिव्हिटी सोल्यूशन्स प्रा. लि.), अमर्ष चतुर्वेदी (सहसंस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, न्युरल मशीनस्), डॉ. नीयन मार्चोन (प्रोग्राम डायरेक्टर, उच्च शिक्षण संचालनालय, गोवा सरकार), डॉ. विजय बोर्जिस (प्रोजेक्ट डायरेक्टर, तांत्रिक शिक्षण संचालनालय), अमोघ कामत तारकार (वरिष्ठ डेटा सायंटिस्ट, इनोव्हेशन लॅब्स, पर्सिस्टंट), डी. एस. प्रशांत (मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल, डीआयटीईएन्डसी), श्रीराम फडते (सेंटर हेड – गोवा, मॅक्लारेन स्ट्रॅटेजिक सोल्यूशन्स), अमरेश कंटक (संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अॅटलासकोर लॅब्स), ललित सारस्वत (मुख्य कार्यकारी अधिकारी, सांकवाळ टेक्नॉलॉजीज), भावित नाईक (सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑनस्ट्रो) आणि आनंद प्रभुदेसाई (कार्यकारी संचालक आणि मुख्य संचालन अधिकारी, टर्टलमिंट) यांचा समावेश होता. या व्यतिरिक्तही अनेक तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांनी या समिटमध्ये आपले विचार मांडले.

शिकण्याचा, नेटवर्किंगचा आणि नवोपक्रमाचा दिवस ठरलेला हा समिट गोव्याच्या तंत्रज्ञान समुदायासाठी अमूल्य ठरला. यामुळे नव्या कल्पनांची देवाणघेवाण झाली आणि उद्याच्या संधींवर एकत्र काम करण्याची प्रेरणा मिळाली.

गोवा सरकारच्या ठोस पाठबळामुळे हा कार्यक्रम गोव्याच्या तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढत्या भूमिकेतील नवोपक्रमशील आणि डिजिटल भविष्याकडे नेणाऱ्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें