अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेतर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धे’चा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा !*

 

दिनांक : २९.१०.२०२६

_*शिक्षण खात्याचे राज्यातील सर्व शाळांना परिपत्रकाद्वारे आवाहन*_

*अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेतर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धे’चा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा !*

पणजी, २९ ऑक्टोबर – अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेने युवकांमध्ये शौर्यजागृती करण्यासाठी आगामी दिपावलीच्या निमित्ताने राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धे’चे आयोजन केले आहे. अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज आणि पुरातत्त्व संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत राज्यातील सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच विशेष मुलांसाठीच्या शाळा यांच्या प्रमुखांनी त्यांच्या शाळेतील अधिकाधिक मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन शिक्षण खात्याने एका परिपत्रकात केले आहे.
अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेने आयोजित केलेली ‘किल्ले बनवा स्पर्धा’ ही समुदाय आणि वैयक्तिक घरगुती स्तर, अशा दोन विभागांमध्ये घेतली जाणार आहे. समुदाय स्तरावरील स्पर्धा जिल्हास्तरावर (उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्हा), तर वैयक्तिक घरगुती स्तरावरील स्पर्धा तालुकास्तरावर घेतली जाणार आहे. या स्पर्धेसाठी बक्षिसे देखील जिल्हा आणि तालुका स्तरांवर देण्यात येणार आहे. नोंदणीसाठी अंतिम तारीख ७ नोव्हेंबर २०२६ आहे. नोंदणी करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करणे आवश्यक आहे. किल्ला हा पर्यावरणपुरक वस्तूंचा (इकोफ्रेंडली) उदा. माती आदीचा वापर करून तयार करणे बंधनकारक आहे. किल्ला बनवण्यासाठी थर्माकोल किंवा फायबर आदी पर्यावरणाला घातक अशा वस्तूंचा वापर करू नये. संपर्कासाठी श्री. सत्यविजय नाईक (९१५८९ ५४४५५) किंवा श्री. सुजय देसाई (९६६५२ १६५५१), असे आवाहन अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेने केले आहे.

आपली विश्वासू,
*अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना*
(संपर्कासाठी ९१५८९ ५४४५५/ ९६६५२ १६५५१)

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें