ज्वेलरी म्हणजे लाइफस्टाइल या विचारापासून प्रेरित, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर सादर करीत आहेत ‘द ग्रेट ज्वेलरी फेस्टिव्हल’

पणजी: दागिने आता केवळ लग्नसोहळे आणि खास प्रसंगांपुरती मर्यादित राहिलेले नाहीत. एव्रीडे वेअर, ऑफिस, सेलिब्रेशन्स, गिफ्टिंग आणि स्वतःची आवड व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून ते आता रोजच्या आयुष्याचा भाग बनत चालले आहेत. दगिन्यांबरोबर असलेलं हे बदलतं नातं लक्षात घेऊन जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी आपल्या ‘द ग्रेट ज्वेलरी फेस्टिव्हल’ च्या निमित्ताने डायमंड, गोल्ड आणि सिल्व्हर ज्वेलरीची विविध रेंज एकत्र घेऊन येत आहेत. हा फेस्टिव्हल १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे.एखादी विशिष्ट दागिन्यांच्या कॅटेगरी किंवा कलेक्शन यावर मर्यादित राहण्याऐवजी, जे. जी. पी. ज्वेलर्सने साकारलेल्या विविध दगिन्यांचे सादरीकरण आहे. कमी वजनाचे, गोल्ड आणि रिअल डायमंडच्या दागिन्यांपासून ते स्टेटमेंट डिझाइन्स आणि लग्नासाठीच्या दागिन्यांपर्यंत, विविध उत्सव, स्टाइल्स आणि आवडीनिवडींना साजेसे पर्याय या फेस्टिव्हलमध्ये एकाच ब्रॅंडच्या अंतर्गत उपलब्ध होणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये रिअल डायमंड ज्वेलरी ₹२५,००० पासून व गोल्ड ज्वेलरी ₹१०,००० पासून उपलब्ध असणार आहे.
रिअल डायमंड ज्वेलरी – ‘अमालिया’ हे ग्राहकांचं सर्वात लाडकं कलेक्शन ठरलं आहे; यात सुंदरता आणि आधुनिक आकर्षकता यांचा सुरेख मेळ साधलेले डायमंड दागिने आहेत.लग्नासाठी ‘सानवी’ हे जे. जी पी. ज्वेलर्सच्या वेडिंग ज्वेलरी कलेक्शन्सपैकी एक असून ते वधूच्या पारंपरिक दागिन्यांसाठी ग्राहकांच्या पसंतीस आले आहे. ‘आम्रपाली’ हे अनेक वर्षांपासूनचं बेस्टसेलर कलेक्शन पारंपरिक आणि प्रसंगानुरूप दागिन्यांचं प्रतीक आहे. ‘यू अँड मी’ हे कलेक्शन पोर्टफोलिओमध्ये सिल्व्हर ज्वेलरीची भर घालतं आणि ज्यांना आपली वैयक्तिक स्टाइल व्यक्त करायची आहे त्यांच्यासाठी आधुनिक डिझाइन्स सादर करतं. एखादा ग्राहक रोजच्या वापरासाठी हलक्या वजनाचा गोल्डचा दागिना निवडू शकतो, वैयक्तिक प्रसंगांसाठी रिअल डायमंडची डिझाइन घेऊ शकतो, किंवा लग्नासाठी अथवा कौटुंबिक सोहळ्यासाठी पारंपरिक दागिने पसंत करू शकतो.
या फेस्टिव्हलविषयी बोलताना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर सानिका पेडणेकर म्हणाल्या, “स्त्रियांसाठी दागिना हा किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे आम्ही जाणतो आणि म्हणूनच कमी जास्त वजनाचे आणि विशेष कलाकुसरीचे, हिऱ्यांचे विविध शैलीचे दागिने आम्ही वैयक्तिक लक्ष देऊन बनवून घेतो. आजच्या काळात ज्वेलरी हे फक्त स्त्रीधन नसून स्त्रियांच्या अस्तित्वाचा भाग असतो. ज्वेलरी मोठ्या प्रसंगांपुरती मर्यादीत नसून दैनंदिन वापरातील भाग आहे, त्यांचा आत्मविश्वास आहे व त्यांच्या नटण्यामुरडण्याचं आनंदाचं माध्यम आहे.”






