श्री शांतदुर्गा सोशिओ कल्चरल अँड एज्युकेशनल असोसिएशन, कांदोळीतर्फे सत्कार सोहळा संपन्न

श्री शांतदुर्गा सोशिओ कल्चरल अँड एज्युकेशनल असोसिएशन, कांदोळीतर्फे सत्कार सोहळा संपन्न

श्री शांतदुर्गा सोशिओ कल्चरल अँड एज्युकेशनल असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी एका विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम श्री शांतदुर्गा मंदिर, कांदोळीच्या सभागृहात पार पडला.

​या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत इंडस्ट्रियालिस्ट डॉ. गुरुदास भालचंद्र नाटेकर उपस्थित होते, तर सन्माननीय अतिथी म्हणून कांदोळी ग्रामपंचायतीचे सरपंच ब्लेझ फर्नांडिस उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात शालेय विद्यार्थ्यांच्या गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. नाटेकर आणि ब्लेझ फर्नांडिस यांचा परिचय करून दिला.

त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. नाटेकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. नाटेकर यांनी विध्यार्थ्यांना विविध क्षेत्रात असलेल्या संधीची माहिती देऊन त्याचा विध्यार्थ्यानी लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले.

यावेळी सरपंच ब्लेझ फर्नांडिस,देवस्थानचे अध्यक्ष डॉ. वासुदेव दुकळे, संस्थेचे अध्यक्ष अजित कामत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी शिरोडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बांदोडकर यांनी केले.

फोटो कॅप्शन: श्री शांतदुर्गा सोशिओ कल्चरल अँड एज्युकेशनल असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात बोलताना डॉ. गुरुदास भालचंद्र नाटेकर, बाजूला कांदोळी ग्रामपंचायतीचे सरपंच ब्लेझ फर्नांडिस, संस्थेचे अध्यक्ष अजित कामत, देवस्थानचे अध्यक्ष डॉ. वासुदेव दुकळे, श्री. बांदोडकर

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें