*KISNA ने गोव्यात प्रवेश करून आपल्या रिटेल नेटवर्कचा विस्तार केला: राज्यातील पहिल्या एक्सक्लुझिव्ह शोरूमचे पणजी येथे उद्घाटन*
*पणजी, गोवा, २२ ऑगस्ट २०२६:* KISNA Diamond & Gold Jewellery ने पणजी, गोवा येथे आपल्या पहिल्या एक्सक्लुझिव्ह शोरूमचे भव्य उद्घाटन केले. हे शोरूम फिडाल्गो हॉटेलजवळ आणि जंटा हाऊसच्या समोर स्थित आहे. उद्घाटन समारंभाला ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद येसो नाईक तसेच हरी कृष्णा ग्रुपचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. घनश्याम ढोलकिया उपस्थित होते.
या भव्य शुभारंभानिमित्त KISNA ने आपल्या ग्राहकांसाठी विशेष प्रास्ताविक ऑफर्स सादर केल्या आहेत. डायमंड ज्वेलरीच्या घडणावळ शुल्कावर १००% पर्यंत, तर गोल्ड ज्वेलरीच्या घडणावळ शुल्कावर ५०% पर्यंत सूट दिली जात आहे. याशिवाय, ग्राहकांना जुने सोने एक्सचेंज करून डायमंड ज्वेलरीच्या खरेदीवर १०५% मूल्य मिळवता येणार आहे. शुभारंभ आणखी खास करण्यासाठी पहिल्या ५० ग्राहकांना मोफत चांदीचे नाणे देण्यात येणार आहे.
हरी कृष्णा ग्रुपचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. घनश्याम ढोलकिया म्हणाले, “आम्ही संपूर्ण भारतात आमचा विस्तार करत असताना, गोवा हा KISNA च्या प्रवासातील एक रोमांचक नवीन अध्याय आहे. या राज्यातील आमचा प्रवेश हा दर्जेदार हिऱ्यांचे दागिने आणि विश्वासार्ह खरेदीचा अनुभव ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही नवीन बाजारपेठा आणि नवीन घरांपर्यंत पोहोचत असताना, प्रत्येक भारतीय घरापर्यंत हिऱ्यांचे दागिने पोहोचवण्याच्या आमच्या ‘हर घर KISNA’ या ध्येयाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
KISNA Diamond & Gold Jewellery चे CEO श्री. पराग शाह म्हणाले, “KISNA च्या वाढत्या विस्ताराच्या प्रवासात गोव्याची भर पडल्याचा आम्हाला आनंद आहे. सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना, आम्ही आधुनिक डिझाइन्सची अनोखी श्रेणी आणि आकर्षक ऑफर्स सादर करण्यास उत्सुक आहोत. यामुळे ग्राहकांना त्यांचे खास क्षण साजरे करण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी अधिक पर्याय मिळतील.”
KISNA चे एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट पार्टनर श्री. सुधेंदू गोकुळदास कर्पे म्हणाले, “KISNA सोबत भागीदारी करून त्यांचे हिऱ्यांचे आणि सोन्याचे दागिने गोव्यात आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आपल्या खास क्षणांचे सेलिब्रेशन करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी KISNA ला पणजीमधील आघाडीच्या दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक बनवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
सामाजिक बांधिलकी जपत KISNA ने शुभारंभाच्या वेळी गरजूंसाठी अन्नवाटप कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमात ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या समर्थनार्थ स्वच्छता मोहीम आणि रक्तदान शिबिराचाही समावेश होता.






