*गोव्यात मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते AI आधारित स्टोरीटेलिंग प्लॅटफॉर्म CogniFilm आणि Comiqly चे उद्घाटन*
या प्लॅटफॉर्मच्या लॉन्चमुळे गोव्याची ‘भारताची क्रिएटिव्ह कॅपिटल’ म्हणून ओळख तसेच स्टार्टअप, AI आणि क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचे वाढते केंद्र म्हणून स्थान आणखी मजबूत
*१४ ऑगस्ट २०२६*: चित्रपट निर्मिती, कॉमिक्स, अॅनिमेशन आणि डिजिटल स्टोरीटेलिंग यांना एकत्र आणणारे AI आधारित CogniFilm आणि Comiqly हे दोन प्लॅटफॉर्म गोव्यात माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स, पर्यटन, मुद्रण आणि लेखनसामग्री मंत्री श्री. रोहन ए. खंवटे यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले. TAWAI STUDIO यांनी विकसित केलेल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांसाठी AI च्या मदतीने कंटेंट तयार करणे, प्रकाशित करणे आणि वितरित करणे क्रिएटर्सना शक्य होणार आहे. यामुळे गोव्यातील वाढत्या स्टार्टअप आणि क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्राला आणखी चालना मिळणार आहे.
या लॉन्चमुळे तंत्रज्ञान, उद्योजकता आणि क्रिएटिव्हिटी यांचा संगम असलेले केंद्र म्हणून गोव्याची ओळख आणखी मजबूत होत आहे. मजबूत क्रिएटिव्ह कम्युनिटी, वाढते स्टार्टअप क्षेत्र आणि नवीन तंत्रज्ञानावर वाढता भर यामुळे गोव्यातून जागतिक स्तरावर उपयोगी ठरणारी उत्पादने विकसित करण्यासाठी कंपन्या आणि क्रिएटर्सना नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स, पर्यटन, मुद्रण आणि लेखनसामग्री मंत्री श्री. रोहन ए. खंवटे म्हणाले, “गोवा नेहमीच क्रिएटिव्हिटी, संस्कृती आणि स्टोरीटेलिंगसाठी ओळखला जातो. आता याच मजबूत पायावर पुढे जात गोव्याला भारताची ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. CogniFilm आणि Comiqly चे लॉन्च हे या प्रवासाचेच एक उदाहरण आहे, जिथे तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटी एकत्र येऊन नव्या संधी निर्माण करत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे फिल्ममेकिंग, अॅनिमेशन, कॉमिक्स आणि डिजिटल स्टोरीटेलिंगमध्ये मोठे बदल होत आहेत आणि या बदलाचे नेतृत्व करण्यासाठी गोवा योग्य ठिकाणी आहे. वाढते स्टार्टअप क्षेत्र आणि प्रगत तंत्रज्ञानाचे वातावरण यामुळे नवकल्पना करणारे आणि क्रिएटर्स नवीन कल्पना विकसित करू शकतील, जागतिक स्तरावर उपयोगी उत्पादने तयार करू शकतील आणि भारताच्या क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेच्या भविष्यात योगदान देऊ शकतील, असे वातावरण तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
TAWAI STUDIO चे CEO श्री. जॉयदीप रक्षित म्हणाले, “गोवा हे कला, संस्कृती आणि स्टोरीटेलिंगसाठी प्रसिद्ध आहे. आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या नवकल्पनांचेही गोवा एक केंद्र म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे AI आधारित स्टोरीटेलिंगचे भविष्य घडवण्यासाठी गोवा हे एक उत्तम ठिकाण आहे. गोव्याची सक्रिय क्रिएटिव्ह कम्युनिटी, वाढते स्टार्टअप क्षेत्र आणि उत्कृष्ट टॅलेंट यामुळे जगभरातील क्रिएटर्स आणि प्रेक्षकांसाठी उपयुक्त उत्पादने विकसित करण्यासाठी योग्य वातावरण येथे उपलब्ध आहे.”
TAWAI STUDIO यांनी विकसित केलेले CogniFilm हे वेब-आधारित मायक्रो-OTT प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे क्रिएटर्स AI च्या मदतीने तयार केलेले चित्रपट, शॉर्ट-फॉर्म सिरीज आणि ऑडिओ कंटेंट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतात. या प्लॅटफॉर्मवर क्रिएटर्सना AI आधारित सिनेमॅटिक कंटेंट प्रकाशित आणि वितरित करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ मिळते. तसेच प्रेक्षकांना AI आधारित मनोरंजनाचा निवडक कंटेंट पाहता येणार आहे.
CogniFilm सोबतच Comiqly हे AI आधारित प्लॅटफॉर्मही लॉन्च करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने क्रिएटर्स AI टूल्सचा वापर करून कॉमिक्स, कार्टून्स आणि अॅनिमेटेड कथा तयार आणि प्रकाशित करू शकतात. कॉमिक्स तयार करणे अधिक सोपे आणि सर्वांसाठी उपलब्ध करून देणे, तसेच जगभरातील प्रेक्षकांसाठी अॅनिमेटेड एपिसोडिक कंटेंट तयार करण्याची संधी देणे हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे.
या लॉन्चला गोव्याशीही विशेष संबंध आहे. TAWAI STUDIO च्या सह-संस्थापक सौ. उज्वला जाधव न्हिवेकर या गोव्यातील असून, तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्ह इनोव्हेशन क्षेत्रात योगदान देणाऱ्या गोमंतकीय टॅलेंटचे त्या प्रतिनिधित्व करतात. त्यांचा प्रवास गोव्यातील टॅलेंटला राज्याच्या क्रिएटिव्ह इकोसिस्टमशी जोडलेले राहून जागतिक स्तरावर उपयोगी उत्पादने विकसित करण्याच्या संधी उपलब्ध असल्याचे दाखवतो.
CogniFilm आणि Comiqly चे लॉन्च हे गोव्याच्या विकसित होत असलेल्या स्टार्टअप आणि क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे इनोव्हेशन, उद्योजकता आणि क्रिएटिव्हिटी यांचा एकत्रित विकास करणारे राज्य म्हणून गोव्याची महत्त्वाकांक्षा अधिक मजबूत झाली आहे. गोवा स्टार्टअप्स, क्रिएटर्स आणि तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांना आकर्षित करत असताना, स्टार्टअपसाठी वाढते केंद्र आणि भारताची ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ म्हणून गोव्याचे स्थान आणखी मजबूत होत आहे.






