हिंदु जनजागृती समितीचा ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’उपक्रम*_ *राज्यभर प्रशासन, पोलीस आणि विद्यालये या ठिकाणी केले प्रबोधन*

_

दिनांक : ९.८.२०२६

_*हिंदु जनजागृती समितीचा ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’उपक्रम*_

*राज्यभर प्रशासन, पोलीस आणि विद्यालये या ठिकाणी केले प्रबोधन*

पणजी, ९ ऑगस्ट – हिंदु जनजागृती समिती स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यभर ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत विविध विद्यालयांचे व्यवस्थापन, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती आणि विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे करण्यात येत आहे. हिंदु जनजागृती समिती गेल्या २३ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत फोंडा, म्हापसा, वास्को, काणकोण, आदी ठिकाणातील विद्यालयांचे व्यवस्थापन, प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी यांना याविषयी निवेदने देण्यात आली.
या निवेदनात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असलेली जिल्हास्तरीय ‘राष्ट्रध्वज संरक्षण कृती समिती’ निर्माण करणे, जिल्ह्यामध्ये प्लास्टिकचे राष्ट्रध्वजांचे उत्पादन, साठवण, वितरण अथवा विक्री यांवर त्वरित कारवाई करणे, सर्व सार्वजनिक ठिकाणी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ ही मोहीम प्रभावीपणे राबवणे आणि स्वातंत्र्यदिनानंतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज तातडीने संकलित करून त्यांची नियमानुसार सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्ो, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभत आहे.

आपला नम्र,
*डॉ. मनोज सोलंकी, गोवा राज्य, समन्वयक*
हिंदु जनजागृती समितीकरिता, (संपर्क : ९३२६१०३२७८)

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें