सम्राट क्लब हळदोणा तर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
हळदोणा : ३०/०७/२०२६ : सम्राट क्लब हळदोणा यांच्या वतीने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साई भक्ती मंदिर, हळदोणा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेचा गौरव करत यावेळी प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आचल आनंद नाईक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.आचल आनंद नाईक यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून भरतनाट्यमची साधना सुरू केली. त्यांनी भरतनाट्यममधील विशारद पूर्ण पदवी प्राप्त केली आहे. नृत्यक्षेत्रात त्यांना १८ वर्षांचा अनुभव असून त्या बिचोलीम येथे नृत्य प्रशिक्षक म्हणून वर्ग घेतात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्राट सर्वेश रायकर यांनी केले. सम्राट क्लबच्या अध्यक्षा सौ. सत्वशीला म्हालदार यांनी उपस्थित सर्व मान्यवर तसेच सम्राट क्लबच्या सदस्यांचे स्वागत केले.

त्यानंतर सम्राट सिद्धी रायकर यांनी सत्कारमूर्ती आचल आनंद नाईक यांचा परिचय करून दिला. त्यानंतर क्लबच्या अध्यक्षा सौ. सत्वशीला म्हालदार यांच्या हस्ते आचल नाईक यांचा सत्कार करण्यात आला.देवस्थानचे सचिव सम्राट विश्वास नाईक यांनी सत्कारमूर्ती अंचल आनंद नाईक यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले.
गुरुपौर्णिमेच्या या कार्यक्रमाला हळदोणा परिसरातील अनेक नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय शास्त्रीय नृत्यकलेची साधना करणाऱ्या कलाकाराचा सन्मान केल्याबद्दल उपस्थितांनी सम्राट क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले.सम्राट देवेंद्र मावळंकर यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सम्राट क्लबच्या सचिव सम्राट रामा केरकर यांनी आभारप्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, सदस्य आणि नागरिकांचे आभार मानले. त्यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास सम्राट दिलीप हळदणकर, सम्राट रवींद्र पणजीकर, सम्राट चंदू म्हालदार, सम्राट संदीप पेडणेकर, सम्राट मंगल हळदणकर, सम्राट विश्वास नाईक, सम्राट शाम सरमळकर आणि सम्राट रामकांत अणवेकर यांची उपस्थिती लाभली. तसेच हळदोणा परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






