थिवि वाताहार
लायन्स क्लब ऑफ म्हापसा चा 26_ 27 या वर्षासाठीचा 62 वा पदग्रहण सोहळा बोडगेश्वर सभागृह मापसा येथे संपन्न झाला यावेळी दीपक नाईक
यांनी क्लबची अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली.
यांनी क्लबची अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली.समारंभाचे प्रारंभी क्लबच्या सचिव दीपक नाईक यांनी वर्षभरासाठी विविध सेवा उपक्रमाचा सविस्तर अहवाल सादर केला त्यानंतर हर्षा वळवईकर यांनी ईश्वस्तवन सादर केले क्लबचे माजीअध्यक्ष श्रेया नाईक यांनी सभेला आरंभ करून उपस्थितांचे स्वागत केले .गोकुळदास नागवेकर यांनी ध्वजवंदन केले तर जगातील शांततेसाठी यावेळी दोन मिनिटं मौन पाळण्यात आले .
पदग्रहण अधिकारी आग्नेलो सिल्वा यांचा परिचय उदय नासनोडकर यांनी करून दिला, नव्या सदस्यांना परिचय सुदेश कोचरेकर यांनी करून दिला आग्नेलो सिल्वा यांच्या हस्ते नव्या सदस्यांना शपथ देण्यात आली त्यानंतर नवीन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा पार पडला ,नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक नाईक यांचा परिचय मनोज चिंदरकर यांनी करून दिला दीपक नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रदूषण विरुद्ध जनजागृती हा आपला वर्षाचा प्रमुख सेवा प्रकल्प असल्याची घोषणा केली. अनावश्यक हॉर्नमुळे विद्यार्थी ,लहान मुले गर्भवती महिला जेष्ठ नागरिक आणि रुग्णाच्या आरोग्य वर होणाऱ्या दुष्परिणाम यावर त्यांनी प्रकाश टाकला शाळा रुग्णालय आणि इतर संवेदनशील ठिकाणी नो हॉर्न झोन प्रभावीपणे राबविण्यात जनजागृती करणे असल्याचे त्यांनी सांगितले याशिवाय पर्यावरण संवर्धन ,समुद्रकिनारा संरक्षण, वृक्षारोपण शिक्षण आरोग्य आणि समाजपयोगी सेवा उपक्रमात प्राधान्य देण्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले समाजातील प्रत्येक घटकावर ध्वनी प्रदूषण कमी करण्याचा पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले समारंभात लायन क्लब तर्फे पिपल्स हायस्कूल कामूर्ली यांना 4छताचे पंखे भेट देण्यात आले, तसेच दयानंद बांदोडकर मेमोरियल हायस्कूल वेरे यांच्या एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांक विद्यार्थी दीपक गावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी जयमोल नाईक महादेव वेणैकर ,दीपक तिळवे, रईस हकीम यांचा क्लब तर्फे गौरव करण्यात आला कार्यक्रमात सूत्रसंचालन सुदेश कोचरेकर यांनी केले तर आभार श्रीधर नाईक यांनी केले
फोटो भारत बेतकेकर
लायन्स क्लब म्हापसा अधिकार पदग्रहण सोहळा






