पीपल्स विद्यालयाचा संस्थापक दिन उत्साहात

पीपल्स विद्यालयाचा संस्थापक दिन उत्साहात

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे – अंजू तिंबलो

पणजी: सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. विद्यार्थ्यांनी आपली स्पर्धा इतरांशी न करता स्वतःशी करावी , आपले ध्येय निश्चित करावे व येणाऱ्या परिस्थितीवर मात करत पुढे येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा असे प्रतिपादन फामेंतो रिसॉर्टच्या व्यवस्थापकीय संचालिका अंजू तिंबलो यांनी केले. मळा -पणजी येथील पीपल्स एज्युकेशन ट्रस्ट संचलित पीपल्स विद्यालयाच्या ११८व्या संस्थापक दिन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
यावेळी पीपल्स एज्युकेशन ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त राहूल देशपांडे, विश्वस्त शिल्पा देशपांडे, उद्योजक मनोज काकूलो, पांडूरंग काकूलो, सूरज काकूलो , काकूलो परिवार तसेच ९०व्या वर्धापन दिन समितीचे सदस्य, पीपल्सच्या विविध विभागांचे प्रमुख,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

प्रारंभी पीपल्स विद्यालयाचे संस्थापक स्व.मंगेश फोंडू सुर्लकर यांना पीपल्स तसेच काकूलो परिवारातर्फे आदरांजली वाहण्यात आली.त्यानंतरच्या सत्रात
काकूलो परिवाराने पीपल्स एज्युकेशन ट्रस्टला ५० लाख रूपयांची देणगी दिल्याबद्दल पीपल्स व्यवस्थापनाने काकूलो परिवाराचे विशेष आभार मानले.यावेळी मनोज काकूलो, पांडूरंग काकूलो व सूरज काकूलो यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मनोज काकूलो यांनी पीपल्सला भविष्यातही सर्वतोपरी सहाय्य करण्याचे वचन दिले. यावेळी त्यांनी पीपल्स व्यवस्थापनाचे साधनसूविधा व शैक्षणिक प्रगतीबद्दल विशेष कौतुक केले. तसेच आपल्यातर्फे
१० वर्गखोल्यांमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

व्यवस्थापकीय विश्वस्त राहूल देशपांडे यांनी संस्थापक स्व. मंगेश फोंडू सुर्लकर यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. श्रेयस बोरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थापक दिनाचे औचित्य साधून दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधूश्री तिंबले , साम्युएल डायस व त्रिवेणी सरदेसाई यांनी तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापिका मरिलिया एस्टीव्हज यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें