म्हार्दाेळ येथे ३१ मे या दिवशी एकदिवसीय ‘राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद !

म्हार्दाेळ येथे ३१ मे या दिवशी एकदिवसीय ‘राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद !

मंदिरांची सुरक्षा, मंदिर परिस मद्य-मांस मुक्त व्हावा, वस्रसंहिता यांसह अनेक प्रमुख विषयांवर चर्चा!

फोंडा, २९ मे – गोव्यात मंदिरांना अपुरे धन, तोकडी सुरक्षा व्यवस्था अशा समस्या आहेत. तसेच मंदिरांची भूमी बळकावण्याचे प्रकारही होत आहेत, तसेच अजूनही पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या काही मंदिरांचा जीर्णोद्धार झालेला नाही. मंदिरांच्या विविध प्रथा-परंपरा यांवरील बंधने दूर करण्ो आणि मंदिरांच्या समस्यांच्या निराकरणसाठी गोमंतक मंदिर महासंघ कार्यरत आहे. त्या दृष्टीने एकूणच अशा समस्यांवर व्यापक चर्चा व्हावी, मदिरांचे संघटन व्हावे, मंदिरांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी पुढाकार घ्यावा, मंदिरांमध्ये वस्रसंहिता लागू करावी यांसाठी  गोमंतक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या  संयुक्त विद्यमाने सिंहपुरुष सभागृह, श्री महालसा संस्थान, म्हार्दोळ येथे रविवार, ३१ मे या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत ‘राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद’ आयोजित  करण्यात आली आहे. या परिषदेत विविध निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक, फोंडा येथील श्री केशव देवस्थानचे श्री. संजय घाटे, शिरोडा-फोंडा येथील श्री शिवनाथी देवस्थानचे श्री. जयंत मिरिंगकर, बांदोडा येथील श्री महालक्ष्मी संस्थानचे श्री. आशुतोष सरदेसाई आणि ढवळी-फोंडा येथील श्री भगवती देवस्थानचे श्री. प्रदीप बखले यांची उपस्थिती होती.
मंदिर न्यास परिदषदेविषयी अधिक माहिती देतांना श्री. सत्यविजय नाईक म्हणाले ‘‘मंदिर महासंघाचे १७ हजारहून अधिक विश्वस्त, पुरोहित, धार्मिक संस्था, भक्त यांचे संघटन असून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इ. राज्यांतील  २ हजार ४०० हून अधिक मंदिरांत वस्रसंहिता लागू करण्यात आली आहे. मंदिर महासंघाने महाराष्ट्रातील मंदिरांची शेकडो एकर भूमी घोटाळेबाजांपासून वाचवली आहे. कर्नाटकात मंदिर महासंघाच्या विरोधामुळे मंदिरांकडून धन घेणारे ‘मंदिर अन् धर्मादाय संस्था कर सुधारणा विधेयक २०२४’ संमत होऊ शकले नाही. कर्नाटकातून गायब झालेल्या ४ हजार १७० मंदिरांच्या पुनर्भस्तित्वासाठी आंदोलन करण्यात आले. यांसह मंदिरांच्या विविध प्रश्नांसाठी मंदिर महासंघ सातत्याने लढत आहे.’’

परिषदेला अनेक मान्यवरांची उपस्थिती !
परिषदेविषयी अधिक माहिती देतांना श्री. सत्यविजय नाईक म्हणाले,‘‘या परिषदेला उच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुरेश रिवाणकर, अधिवक्ता सुरेश राव, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांसह विविध मंदिरांचे विश्वस्त आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.’’

मंदिरांची सुरक्षा यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर परिषदेत चर्चा !
श्री. जयेश थळी पुढे म्हणाले,‘या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, तसेच मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यात प्रामुख्याने पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची भूमी हिंदूंना परत मिळवून देणे, मंदिर विश्वस्तांचे संघटन करणे, मंदिर संस्कृती रक्षणासाठी प्रयत्न करणे, मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्र बनवणे, मंदिर परिसर मद्य-मांस मुक्त करणे, मंदिर-जत्रा उत्सव अशा ठिकाणी हिंदू सोडून अन्य धर्मियांना स्टॉल उभारण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये आदी विषयांवर चर्चा होणार आहे. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी ९५२७७ ६००६१, ९३२६१०३२७८ या क्रमांकावर संपर्क साधावा’’.

मंदिरांचे संघटन होणे आवश्यक ! – प्रदीप बखले, श्री भगवती देवस्थान, ढवळी, फोंडा
श्री. प्रदीप बखले म्हणाले,‘‘मंदिरांचे पदाधिकारी सोडून कामगार, उद्योजक आदी सर्वांचीच आपापली संघटना आहे; मात्री मंदिर पदाधिकारी यांची संघटना नाही. गोमंतक मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिर पदाधिकार्‍यांचे संघटन करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मंदिर पदाधिकारी आपापल्या मागण्या संघटीतपणे सरकार दरबारी मांडू शकणार आहेत’’.

मंदिरांमधून धार्मिक शिक्षण देणे आवश्यक ! – श्री. संजय घाटे, श्री केशव देवस्थान, फोंडा
श्री. संजय घाटे म्हणाले,‘‘मंदिरांमधून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची सोय उपलब्ध केली पाहिजे आणि यामुळे धर्माविषयी अंधश्रद्धा दूर होण्यास साहाय्य होणार आहे’’.

आपला नम्र
श्री. जयेश थळी,
गोमंतक मंदिर महासंघ
(संपर्क क्रमांक : ९५२७७ ६००६१)

Photo Caption – पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना संबोधित करतांना मध्यभागी सर्वश्री जयेश थळी, तर बाजूला (डावीकडून) श्री. आशुतोष सरदेसाई, श्री. सत्यविजय नाईक, जयंत मिरींगकर, संजय घाटे आणि नारायण नाडकर्णी

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें