गोव्यातील मठमंदिरे आणि संस्कृती यांच्या रक्षणार्थ उभारलेल्या संघर्षाची माहिती असलेले संग्रहालय उभारा ! – श्री. टी. राजासिंह, आमदार, भाग्यनगर
पणजी, २३ मे – गोव्यातील मठमंदिरे आणि संस्कृती यांच्या रक्षणार्थ उभारलेल्या संघर्षाची माहिती असलेला संग्रहालय उभारावे. यामुळे गोव्याला भेट देणारे पर्यटक आणि भावी पिढी यांच्यापर्यंत गोव्यातील संघर्षाची माहिती पोहोचण्यास साहाय्य होईल, असे आवाहन भाग्यनगरचे (हैदराबादचे) आमदार तथा ‘श्रीराम युवा सेना’चे संस्थापक-ंअध्यक्ष श्री. टी. राजासिंह यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि गोवा राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक यांची उपस्थिती होती.
आमदार श्री. टी. राजासिंह पुढे म्हणाले,‘‘फोंडा येथील मर्दनगड किल्ला हा छत्रपति संभाजी महाराज यांनी स्वत: बांधलेला गोव्यातील एकमेव किल्ला आहे. हा किल्ला महाराजांचे शौर्य आणि धैर्य यांचे प्रतिक आहे. जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ हा पोर्तुगिजांनी हिंदूंवर लादलेल्या ‘गोवा इन्क्विझिशन’चा एकमेव पुरावा आहे. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे आणि इन्क्विझिशनच्या काळात केलेले अमानवीय अत्याचार आणि धर्मांतर यांची वास्तविकता आजच्या तसेच पुढच्या पिढ्यांना कळणे आवश्यक आहे. गोवा सरकारने ‘गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९७८’ अंतर्गत फोंडा येथील मर्दनगड आणि जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण आणि संवर्धन करण्याविषयी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही ऐतिहासिक स्थळे लवकरात लवकर अधिसूचित करून या स्थळांचे संवर्धन करण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत. गोवा सरकारने बांगलादेशी रोहिग्यांना शोधून काढून त्याला येथून हाकलले पाहिजे. गोव्यात धार्मिक संस्कृतीलाही प्रोत्साहन दिले पाहिजे’’.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले,‘‘ फोंडा येथील मर्दनगड किल्ला आणि जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ संरक्षित करण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न स्तुत्य आहे. संविधानाने प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार दिलेला असताना जुने बसस्थानक, फोंडा येथे २४ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचाराचे र्हाेर्डिंगवर २० मे या दिवशी रात्री काही धर्मद्रोह्यांनी अश्लील चित्रे काढली आहेत. स्वत:ला ‘डॉन’ संबोधणार्या एका व्यक्तीने सभेच्या विरोधात सामाजिक माध्यमात पोस्ट घातला आहे. हिंदुत्ववादी संघटनांना विनाकारण डिवचण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. गोवा राज्य हे शरीयत कायद्यानुसार नव्हे, तर संविधानानुसार चालते हे तथाकथित ‘डॉन’ आणि त्याचे समर्थक यांनी ध्यान्यात ठेवावे’’.
|
|
गोव्यातील मठमंदिरे आणि संस्कृती यांच्या रक्षणार्थ उभारलेल्या संघर्षाची माहिती असलेले संग्रहालय उभारा ! – श्री. टी. राजासिंह, आमदार, भाग्यनगर
Advertisement






