बांदोडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या शौर्य प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ*

_

दिनांक : ९.५.२०२६

*बांदोडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या शौर्य प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ*
फोंडा, ९ मे – स्वसंरक्षण आणि राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करणे यांसाठी, तसेच मनुष्यातील शारीरिक आणि मानसिक दुर्बलता घालवून त्याच्यातील सुप्त शक्ती जागृत करण्ो यांसाठी बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदान येथे ९ मे या दिवशी सकाळी ६.३० वाजल्यापासून हिंदु जनजागृती समितीच्या शौर्य प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाला आहे. हे शिबिर १५ मेपर्यंत सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत चालणार आहे. युवक-युवतींसाठी असलेले हे शिबिर विनामूल्य आहे. शिबिरात ९ मे या दिवशी सकाळच्या सत्रात २५ युवा-युवकांनी सहभाग घेतला होता.
शिबिराच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर शिबिराचा उद्देश सांगतांना म्हणाले,‘‘ हे शिबिर हर घर योद्धा’ या विशेष अभियानाच्या अंतर्गत घेतले जात आहे आणि प्रत्येक घरामध्ये असा ‘योद्धा’ सिद्ध होणे आज काळाची गरज बनली आहे. या शिबिराचा समस्त हिंदूंनी लाभ करून घ्यावा.’’ शिबिरामध्ये लाठी-काठी आणि लाठी युद्ध, दंडसाखळी आणि ‘मिक्स मार्शल आर्ट’ यांसारख्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे कौशल्य शिकवले जात आहेत. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी यासंबंधी अधिक माहितीसाठी ९३२६१०३२७८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,*
हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें