अमरकंटक येथे इंडियन फेडरेशन जर्नालिस्टच्या संमेलनात विविध निर्णय, पत्रकारांचा गौरव,
हरमल वार्ताहर
इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टच्या 144 व्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.सदर बैठक मध्यप्रदेशच्या पवित्र नर्मदेहर अमरकंटक येथे श्री कल्याणसेवा केंद्राच्या सभागृहात पार पडली.
ह्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अवधेश भार्गव,मध्यप्रदेश पत्रकार संघाचे उपेंद्र गौतम,बिहारचे एस एन श्याम,महाराष्ट्राचे हितेश मावळणकर,राजस्थानचे रमेश गांधी आदी विविध राज्यातील पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.पत्रकार सुरक्षा कायदा राबवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रत्येक राज्यातील संघटनेने मुख्यमंत्री व सबंधित खात्यांना निवेदन देण्याचे सर्वानुमते संमत केले. पेन्शन योजना चालीस लावण्यासाठी स्वतंत्र अधिकारीणितर्फे पत्रकारांना सहाय्य योजना आखली जावी,असे सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
ह्या संमेलनात गोव्यातील चार पत्रकार विनोद मेथर,संदीप कामुलकर, भरत बेतकेकर,चंद्रहास दाभोलकर तसेच तुकाराम शेठगांवकर,मनोज आरोलकर यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.ह्यावेळी भरत बेतकेकर व चंद्रहास दाभोलकर यांनी मनोगत व्यक्त केले.
इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालस्ट राष्ट्रीय अध्यक्ष अवधेश भार्गव यांनी पत्रकार सुरक्षा कायदा, मिडिया कौन्सिलची स्थापना व पत्रकाराच्या हितासाठी योजना राबवण्याचे आवाहन व त्यासाठी तत्पर राहणार असल्याचे जाहीर केले.ह्यावेळी शिस्तपालन समितीची स्थापना केली.
ह्यावेळी बिहार,महाराष्ट्र,उत्तराखंड,राजस्थान, आंध्रप्रदेश,गोवा,छत्तीसगड व आयोजक मध्यप्रदेश पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध समस्या मांडल्या व सोडविण्याचे आवाहन केले.सूत्रनिवेदन गौतम कपूर तर राहुल राणा यांनी आभार मानले.ह्या संमेलनात विविध राज्यातील 200 पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते.
फोटो
अमरकंटक येथे आय एफ डब्ल्यु जे च्या संमेलनात गोव्यातील पत्रकाराचा सत्कार प्रसंगी विनोद मेथर,संदीप कामुलकर, भरत बेतकेकर,चंद्रहास दाभोलकर तसेच मनोज आरोलकर, तुकाराम व राष्ट्रीय अध्यक्ष अवधेश भार्गव,राहुल राणा व अन्य






